दाढी करा आणि जे केलंय ते पूर्ववत करा; निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर प्रकाश राज यांचा टोला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या संकट काळात देशात पाच राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या. आज निवडणूकानंतर मतमोजणी होत असून निकाल जाहीर होणार आहेत. अवघ्या काही वेळातच निकाल सर्वांसमोर येणार आहे. पश्चिम बंगालमधून येणाऱ्या निकालांबाबत अनेकजण ट्विट करतायत. अशामध्ये अभिनेते प्रकाश राज यांनी देखील त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

ADVERTISEMENT

अभिनेते प्रकाश राज यांनी ट्विटरद्वारे त्यांचं मत व्यक्त केलं आहे. प्रकाश राज यांनी त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे.

हे वाचलं का?

प्रकाश राज त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “डन अँड डस्टेड! सर्व मोठ्या नेत्यांना, नागरिकांनी स्पष्टपणं सांगितलं आहे. आता तरी द्वेष आणि व्हायरस पसरवण्याचं काम थांबवा. त्यामुळे आता चांगली दाढी करा आणि तुम्ही जे केलंय ते पूर्ववत करायला सुरुवात करा. लोकांचा जीव महत्त्वाचा आहे.”

दरम्यान अभिनेत्री कंगना राणौतने देखील निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ट्विट करत ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. ती म्हणाली, “बांग्लादेशी आणि रोहिंगे ही ममता बॅनर्जी यांची सर्वात मोठी ताकद आहे. त्याचप्रमाणे सध्या जो ट्रेंड आहे त्यावरुन तर असं दिसतंय की, तिथे बहुसंख्य प्रमाणात हिंदू नाही आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे, बंगाली मुस्लिम हा भारतातला सर्वाधिक गरीब आणि वंचित घटक आहे. छान…अजून एक काश्मिर तयार होतो आहे.”

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT