मोहरमच्या मिरवणुकीसाठी Bombay High Court ची सशर्त परवानगी

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या मोहरम या मुस्लीम बांधवांसाठीच्या महत्वपूर्ण दिवसासाठी बॉम्बे हायकोर्टाने मिरवणुक काढायला सशर्त परवानगी दिली आहे. शिया मुस्लीम सुमदायाने मिरवणुकीला परवानगी मिळावी यासाठी बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल केली होती. जस्टीस के.के.तातेड आणि जस्टीस पी.के.चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

ADVERTISEMENT

या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना मिरवणुकीसाठी कोरोनाचे नियम पाळून आयोजन करायला परवानगी दिली आहे.

All India Idara Tahfaz-e-Hussainiyat या संस्थेने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथीलता आणत लोकल ट्रेन, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल्स, दुकानांना परवानगी दिली होती. त्यामुळे याच निकषावर याचिकाकर्त्या संस्थेने १८-१९-२० ऑगस्ट या तीन दिवसांसाठी १ हजारांच्या समुदायाला दोन तासांसाठी मिरवणुकीचा वेळ देण्याची मागणी केली होती.

हे वाचलं का?

सरकारी वकीलांनी या याचिकेला विरोध करत, धार्मिक कार्यक्रमाला आणि मिरवणुकीला परवानगी दिल्यास जास्त प्रमाणात लोकं रस्त्यावर गर्दी करण्याची शक्यता असल्याचं सांगितलं. तसेच सरकारने जाहीर केलेल्या नियमांनुसार मिरवणुका काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच गर्दीवर नियंत्रण मिळवताना पोलीस यंत्रणेवर ताण येऊ शकतो असा युक्तीवाद सरकारी वकीलांनी केला.

राज्याच्या गृह विभागाकडून मोहरम संदर्भात मार्गदर्शन सूचना जाहीर

ADVERTISEMENT

वकील राजेंद्र शिरोडकर यांनी All India Idara Tahfaz-e-Hussainiyat संस्थेची बाजू कोर्टासमोर मांडली. शिया समुदायामध्ये मिरवणुकीसोबत या दिवसांमध्ये अन्नदान आणि पाणी वाटप केलं जातं. याशिवाय शिया समुदायाच्या धार्मिर रिती पूर्णच होत नाही. मिरवणुकीसाठी १ हजार लोकांच्या उपस्थितीची परवानगी मागितली असली तरीही ही संख्या ठरवण्याचा अधिकार कोर्टाला आहे. तसेच या मिरवणुकीत जी लोकं सहभागी होतील त्यांची नाव आधीच स्थानिक पोलीस स्टेशनला देण्यात येतील अशीही माहिती शिरोडकर यांनी कोर्टासमोर दिली.

ADVERTISEMENT

याआधीही २०२० मध्ये हायकोर्टाने मर्यादीत स्वरुपात मोहरमच्या मिरवणुकांना परवानगी दिल्याचं शिरोडकर यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोरोना महामारीची परिस्थिती नियंत्रणात असल्याचंही याचिकाकर्त्यांनी कोर्टासमोर सांगितलं. खंडपीठानेही यावेळी आपलं मत नोंदवताना सरकारने शॉपिंग मॉल, दुकानं, रेस्टॉरंड, हॉटेल यांना सवलत दिल्याचं नमूद केलं. ज्यावर सरकारी वकीलांनी ही सवलत एकदम देण्यात आली नसून यात पायरी पायरीने विचार करुन हा निर्णय घेतल्याचं सांगितलं. तसेच सरकारने सवलत देताना ज्यांनी लसीचे दोन्ही डोस दिले आहेत त्यांनाच ही सवलत दिल्याचं सरकारी वकीलांनी सांगितलं.

अखेरीस दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर हायकोर्टाने मोहरमच्या मिरवणुकांना परवानगी दिली आहे. ज्यात कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करण्यासोबत मिरवणुकीत ७ ट्रक्स वापरण्याची परवानगी दिली असून प्रत्येक ट्रकमध्ये फक्त १५ लोकांना ३ तासांसाठी परवानगी दिली आहे. तसेच ५ ताझीयांसाठी कोर्टाने परवानगी दिली असून ज्या लोकांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांनाच या ट्रक्सवर मिरवणुकीत सहभागी होण्याची संधी मिळेल असं कोर्टाने स्पष्ट केलंय.

तुमच्यासाठी काय पण! पुण्यात ‘नमो भक्ता’ने उभारलं Narendra modi चं मंदिर

ट्रकवर असणाऱ्या १०५ व्यक्तींपैकी २५ व्यक्तींना मुख्य कार्यक्रमाच्या इथे परवानगी मिळणार आहे. तसेच गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या मिरवणुकीत धर्मगुरुंना सोबत ठेवावं लागणार आहे. या सर्व नियमांचं पालन करण्याच्या हमीवरच मिरवणुकीला परवानगी दिली जाईल असं कोर्टाने यावेळी स्पष्ट केलं.

सरकारचा हिंदूविरोधी एकही आदेश ऐकणार नाही, जन्माष्टमी जोरात साजरी करणार – राम कदमांचा हल्लाबोल

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT