Vaccine Price : लसींच्या किंमतीबाबत दाखल याचिकेवर सुनावणीस बॉम्बे हायकोर्टाचा नकार

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लसींच्या किंमतींबाबत एक याचिका बॉम्बे हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीस बॉम्बे हायकोर्टाने नकार दिला आहे. देशातल्या नागरिकांना प्रति डोस 150 रूपये या समान दराने लस पुरवण्यात यावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. मात्र याबाबत बॉम्बे हायकोर्टाने कोणतीही सुनावणी करण्यास नकार दिला आहे. ती याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे.

ADVERTISEMENT

‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोग जबाबदार’, कोर्ट प्रचंड संतापलं!

काय झालं कोर्टात?

हे वाचलं का?

मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांनी यावेळी याचिकाकर्त्याला आपली याचिका घेऊन सुप्रीम कोर्टात जाण्यास सांगितलं आहे. देशभरासाठी महत्त्वाचे मुद्दे आम्ही का ग्राह्य धरायचे असा प्रश्न विचारत कोर्टाने याचिकाकर्त्याला हा प्रश्न संपूर्ण देशाचा आहे असं सांगितलं कारण लसींच्या किंमती संपूर्ण देशभरात लागू होतात एकट्या महाराष्ट्रात नाही असंही कोर्टाने म्हटलं आहे.

अॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी कोर्टाला हेदेखील सांगितलं की सध्या महाराष्ट्रतल्या तुरुंगात 244 कोरोना रूग्ण आहेत. त्याआधी 188 रूग्ण होते याकडेही त्यांनी कोर्टाचं लक्ष वेधलं. याबाबत वकील मिहिर देसाई यांनीही भाष्य केलं.

ADVERTISEMENT

काय म्हणाले मिहिर देसाई?

ADVERTISEMENT

तळोजा तुरुंगात असलेल्या कैद्यांना गेल्या वर्षी मास्क वाटले आहेत ते कैदी अजूनही तेच मास्क वापरत आहेत. तुरुंगातल्या कैद्यांना तेवढेच मास्क का ? नवे मास्क का देण्यात आलेले नाहीत? असा प्रश्न त्यांनी विचारला. तसंच कोरोनाच्या चाचण्या तुरुंगात थांबल्या आहेत त्या पुन्हा सुरू करण्यात याव्यात. एवढंच नाही तर चाचण्यांनी वेग घ्यायला हवा असंही त्यांनी स्पष्ट केलं. मी तळोजा तुरुंगात गेलो होतो तेव्हा पाहिलं की तिथे 500 कैदी रांग लावून होते, एका रांगेत साठ ते सत्तर लोक होते. कुणीही सोशल डिस्टन्सिंग पाळलेलं नव्हतं.

अॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी म्हणाले की आता तुरुंगातल्या कैद्यांनाही लस दिली पाहिजे. मात्र सध्या आपल्याकडे तीन तुरुंगांमध्येच लस देण्याची सोय आहे. लसींचा तुटवडा भासतो आहे आणि लस देण्यासाठी तयार मेडिकल स्टाफची कमतरता आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT