Rahul Kalate यांनी अर्ज मागे घेतला नाही तरी… अश्विनी जगताप यांचा मोठा दावा
Chinchwad Assembly by poll : पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादी, भाजपच्या दोन्ही तगड्या उमेदवारांमुळे आणि ठाकरे गटाचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानं चिंचवडची पोटनिवडणूक रंगतदार अवस्थेत आली आहे. भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे आणि बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिहेरी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. […]
ADVERTISEMENT
Chinchwad Assembly by poll :
ADVERTISEMENT
पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादी, भाजपच्या दोन्ही तगड्या उमेदवारांमुळे आणि ठाकरे गटाचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानं चिंचवडची पोटनिवडणूक रंगतदार अवस्थेत आली आहे. भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे आणि बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिहेरी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (NCP and BJP and the rebel leader of Thackeray group Rahul Kalate has filed his independent candidature.)
या तिरंगी लढाईमुळे नेमकं कोण आमदार होणार आणि कोण पराभूत होणार असा प्रश्न आहे. पण अर्ज मागे घेण्यासाठी राहुल कलाटे यांची आम्ही मनधरणी करणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितलं आहे. दुसऱ्या बाजूला अश्विनी जगताप यांनी मात्र विरोधकांकडे न पाहता प्रचारावर भर दिला आहे. राहुल कलाटे आणि विठ्ठल काटे या दोघांचं माझ्या पुढे क्षुल्लक आव्हान आहे. त्यांचा मी पराभव करणार असा विश्वास अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केला.
हे वाचलं का?
Crime : पगारवाढ रोखल्याच्या रागातून वरिष्ठाची हत्या… पोलीस दलात खळबळ
अर्ज भरण्याची प्रक्रिया संपल्यानंतर चिंचवड आणि कसबा या दोन्हीही मतदारसंघात प्रचाराची सुरुवात झाली आहे. यात अश्विनी जगतापही सक्रिय झाल्या असून त्यांनी प्रचारावर जोर दिला आहे. अश्विनी जगताप याही प्रचारात सक्रिय झाल्या आहेत. सकाळी घरोघरी जाऊन त्या मतदारांच्या भेटी घेत आहेत. तर संध्याकाळी त्यांनी कोपरा सभांवर भर दिला आहे.
ADVERTISEMENT
BJP च्या बोक्यांच्या तोंडी आयताच लोण्याचा गोळा पडू नये… राऊतांचा काँग्रेसला सल्ला
ADVERTISEMENT
यावेळी बोलताना जगताप म्हणाल्या, मला विरोधकांचे आव्हान क्षुल्लक वाटते. गेली तीस वर्षे झाले माझ्यावर आणि साहेबांवर प्रेम करणारी लोक माझ्या सोबत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे आणि बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचे आव्हान किरकोळ आहे. मला त्यांची कसलीही भीती वाटत नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT