Bow-Arrow Symbol: चिन्ह गमावल्यावर ठाकरेंनी का दाखवली ‘मातोश्री’च्या देवघरातील ‘ती’ वस्तू?
Bow-Arrow Symbol and Uddhav Thackeray: मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shiv Sena) या पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह (Bow- Arrow Symbol) दिल्याने शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) खूप मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या संपूर्ण प्रकरणी आपली प्रतिक्रिया तर दिलीच. पण याच जाहीर […]
ADVERTISEMENT
Bow-Arrow Symbol and Uddhav Thackeray: मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shiv Sena) या पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह (Bow- Arrow Symbol) दिल्याने शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) खूप मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या संपूर्ण प्रकरणी आपली प्रतिक्रिया तर दिलीच. पण याच जाहीर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’च्या देवघरातील एक वस्तू दाखवून शिवसैनिकांच्या जनेतच्या काळजाला हात घालण्याचा प्रयत्न केला. (why did uddhav thackeray show a special item after losing the bow and arrow symbol)
ADVERTISEMENT
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला. मात्र, याच पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी एक खास गोष्ट दाखवली जी आजवर कोणीही पाहिली नव्हती. जेव्हा धनुष्यबाण हे चिन्ह याचा विषय निघाला तेव्हा उद्धव ठाकरेंनी एक छोटंसं धनुष्यबाण मागवलं आणि ते सर्व कॅमेऱ्यांसमोर दाखवल
उद्धव ठाकरेंनी दाखवलं बाळासाहेब पूजा करत असलेलं धनुष्यबाण..
या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी असा दावा केला की, ‘आज जरी आमचं धनुष्यबाण चोरलं असेल तरी आमच्या घरातील देवघरात हा धनुष्यबाण नेहमी असतो. ज्यावर कुंकूं देखील पाहायला मिळेल. या खऱ्या धनुष्यबाणाची पूजा स्वत: बाळासाहेब करायचे. त्यामुळे चिन्ह जरी चोरलं असेल तरी आम्हाला काहीही काळजी नाही.’
हे वाचलं का?
‘आजच्या पुरतं तरी त्यांनी धनुष्यबाण चोरलेलं आहे. धनुष्यबाण कागदावरचं आहे. पण दुसरा धनुष्यबाण आहे, ते माझ्याकडे आहे आणि कायम माझ्याकडे राहणार आहे. अनेकांना असं वाटलं असेल की, शिवसेना संपली. शिवसेना लेचीपेची नाहीये. (शिवसेना प्रमुखांच्या देव्हाऱ्यातील धनुष्यबाण ठाकरेंनी दाखवला) खरा धनुष्यबाण आमच्या पूजेमधला आहे. तो पूजेत राहणार.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.
ADVERTISEMENT
पाहा पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे नेमकं काय-काय म्हणाले:
काय बोलायचे हा देशातला मोठा प्रश्न. निवडणुक आयोगाचा निकाल लोकशाहीसाठी घातक. देशाच्या स्वातंत्र्याचा ७५ वर्षात आता सरकारची दादागिरी सुरु आहे. पंतप्रधानांनी आता जाहीर करावे लोकशाही नाही बेबंदशाही सुरु आहे. न्याययंत्रणा आपल्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न. आजचा निकाल अत्यंत अनपेक्षित. सहा महिने न्यायालयात लढाई सुरु तो पर्यंत निवडणुक आयोगाने निकाल देऊ नये असे बोललो होतो. निवडणुक आयोग बाबत सांगेल जशी न्यायधीश निवडीची प्रक्रिया तशीच निवडणुक आयुक्तांच्या बाबतीत असायला हवी. जगातल्या मोठ्या पक्षाची स्वतः हून लढण्याची हिंमत नाही. निवडणुका घेण्याचे आव्हान मी केले. आता चिन्ह मिंधे गटाला दिल्यावर आता मनपा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता. मुंबईवर ताबा मिळवण्याची भाजपची रणनिती.
ADVERTISEMENT
शिवसेनाप्रमुखांनी पुजलेला धनुष्यबाण आजही माझ्याकडेच. १०० कौरव एकत्र आले तरी पांडव जिंकले. महाराष्ट्रातील जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. सर्वोच्च न्यायालयात आम्ही जिंकू अशी अपेक्षा. केंद्रीय मंत्री म्हणाले होते द्या ब्रेकींग न्यूज. आज धनुष्यबाण ओरबाडून घेतले तरी तुम्हाला मिळणार नाही. चोरी पचली तरी चोर चोरच असतो. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार. तोवर त्यांना पेढे खाऊ द्या. शिवसैनिकांनो खचून जाऊ नका. हिंमत सोडू नका, असे चोर चोरी पचवू शकणार नाही.
आम्ही न्यायालयाला विनंती केली होती की निवडणुक आयोग गडबड करणार. आमचा सर्वोच्च न्यायालयावर आमचा नितांत विश्वास. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या केसवर जगाचे लक्ष. हे सगळे लोकशाही विरोधी कृत्य परकीय गुतंवणूकदार पण बघताहेत. गेले काही दिवस निवडणुक आयोगाचे थोतांड. आम्ही शपथपत्र, अर्ज लाखोंच्या संख्येने. निवडणुक आयोगाने आज शेण खाल्ले. हिंदुत्वाचा त्याग केला म्हणजे काय केले? भाजपने पाठीत वार केला म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो. उद्या त्यांनी नमाज पढले तरी ते हिंदू का?
बाळासाहेबांचे विचार गुलामी करण्याचे नाहीत. आम्ही पोटनिवडणुक जिंकलो. महाराष्ट्रात मोदी नाव चालत नाही. आता बाळासाहेब चोरले. तुम्ही पोटनिवडणुक का नाही लढले. लोकशाही सक्षम व्हावी तर सर्वच क्षेत्रांनी एकत्र यायलाच हवे. आज माध्यमांवर पण धाडी पडताहेत. महाराष्ट्रात आज दोन पोटनिवडणुका सुरु आहेत तेव्हाच निवडणुक आयोगाने निकाल दिला. ते म्हणतात काँग्रेसने तेव्हा तसेच केले, पण म्हणूनच लोकांनी तुम्हाला निवडून दिले. देशाचे न्यायालय ही शेवटची आशा. निवडणुक आयुक्तांच्या विरोधात प्रशांत भू़षण यांनी केस दाखल केलीय. पंतप्रधानांनी दखल घेतली असती तर लोकशाही विरोधात कृत्य झाले नसते. शिवसेना आता जोमाने पुढे येणारच. अंधेरी पोटनिवडणुक झाली तेव्हा पण धनुष्यबाण नव्हते पण अगोदरपेक्षा आम्हाला अधिक मते. उद्या कदाचित आम्हाला दिलेली मशाल पण काढून घेतील. ह्याची नोंद ठेवा. आपण लोकशाही संपतांना आपण गुपचूप बसणार आहोत का? इंदिरा गांधींना पण जनतेने नाकारले होते आणीबाणी लावली म्हणून. यांनी कागदावर धनुष्यबाण चोरलाय. आता भाजप बाळासाहेबांचा चेहरा लावून निवडणुका जिंकायच्या आहे.
पाच न्यायमूर्ती निकाल देणार असतील तर आमचा आक्षेप नाहीच. ते निष्पक्षपणे सुनावणी घेताहेत. जे शिवसैनिक भेटतात त्यांना मी हेच सांगितले आपण १९६६ सालात आहोत. आपण देण्याचे काम केले. निवडणुकांसाठीच निवडणुक आयोगाने ठरवून निकाल दिला. ज्यांनी गद्दारांना नेता बनवले ते माझ्यासोबतच. निवडणुक प्रक्रिया कशी पार पडली त्याच्या सीडी इत्यादी सगळच निवडणुक आयोगाला दिले. सदस्य संख्या, पदाधिकारी आमच्या बाजूने आम्ही त्यांना भारी पडले. आम्ही निवडणुक आयोगाला घरची रद्दी नाही दिली. ज्या पद्धतीने हलकटपणा सुरु आहे तसे कदाचित ते मशाल पण काढून घेऊ शकतात. आज तुमच्या माध्यमातून तातडीने मी शिवसैनिक आणि जनतेसमोर आलो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT