पावसामुळे मुंबईला ब्रेक! मध्य रेल्वे खोळंबल्याने कुठे काय परिस्थिती? वाचा सविस्तर बातमी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुसळधार पावसामुळे वेगात चालणाऱ्या मुंबईला ब्रेक लागला आहे. लोकल वाहतूकचा खोळंबा झाल्याने घरी जाणाऱ्या मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत. या वर्षी पहिल्यांदाच मुंबईला पावसाने ब्रेक लावला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असो किंवा दादर स्टेशन असो सगळीकडेच गर्दी दिसते आहे. घरी जाण्याची वेळ असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. अनेक प्रवासी घरी जाण्यासाठी ट्रेनची वाट बघत आहेत. आपण जाणून घेणार आहोत कुठे काय परिस्थिती आहे?

ADVERTISEMENT

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर प्रवाशांची तोबा गर्दी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. कल्याणच्या दिशेने जाण्यासाठी ही गर्दी झाली आहे. कारण मुसळधार पावसाने अनेक ट्रेन्स रद्द झाल्या आहेत. मुंबई रेल्वे युजर्सने या संदर्भातलं ट्विट केलं आहे. लोकांना आपलं घर गाठायचं आहे. मात्र अनेक ट्रेन रद्द झाल्याने प्रवाशांची सीएसटी स्टेशनवर गर्दी झाली आहे.

ठाण्यातही प्रवाशांची प्रचंड गर्दी

ठाण्यात प्रचंड पाऊस झाला आहे. त्यानंतर ठाणे स्टेशनवरही गर्दी झाली आहे. हा फोटो रात्री साडेआठच्या दरम्यानचा आहे. बराच काळ ट्रेन नसल्याने लोकांनी एक ट्रेन आली त्यात शिरण्यासाठी गर्दी केली ते या फोटोत दिसतं आहे. एवढंच नाही तर प्लॅटफॉर्मवरही किती गर्दी आहे तेच हा फोटो सांगतो आहे.

हे वाचलं का?

मागील तासाभरापासून पडणाऱ्या पावसामुळे ठाण्याहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर मोठ्या प्रमाणवर गर्दी झाली आहे. तर फलाट क्रमांक 4 च्वया ट्रॅकवरही पाणी साचलंय.

ADVERTISEMENT

कळवा आणि मुंब्रा भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस

आज संध्याकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील मुंब्रा परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. या मुसळधार पावसामुळे मुंब्रा येथे ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. रस्त्यांना आणि नाल्यांना नदीचे स्वरूप आले होते. तसेच पूर परिस्थिती निर्माण झाली होती.

ADVERTISEMENT

या ढगफुटी सदृश पावसामुळे आर्ध्या तासात मुंब्रा शहरातील रस्ते, नाले, बाजारपेठ या ठिकाणी दोन ते तीन फूट पाणी साठलेलं पाहण्यास मिळालं. आता पावसाचा जोर कमी झाला असून रस्त्यावरील साचेलेल पाणी कमी झालं आहे. या दरम्यान मुंब्रा रेल्वे स्थानकात देखील रुळावर पाणी साठलं होतं.

कल्याणमध्ये ट्रॅकवर साठलं पाणी

मध्य रेल्वेची वाहतूक आधीच धीम्या गतीने सुरू आहे. प्रवाशांचे हाल होत आहेत अशात कल्याण स्टेशनवरही ट्रॅकवर पाणी साठलं होतं. मुसळधार पाऊस कल्याणमध्येही सुरू होता. अशात कल्याण स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचंही पाहण्यास मिळालं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT