महापालिकेच्या उद्यानात ऐतिहासिक विरंगुळा
मुंबई तक: ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातील दोन पोलादी तोफा आता पालिकेच्या पार्कमध्ये दिसणार आहेत. सुमारे 164 वर्षे या जुन्या तोफांमुळे आता पार्कमध्ये जाणाऱ्यांना ऐतिहासिक ठेवाही अनुभवता येणार आहे. ब्रिटिश काळात समुद्राने वेढलेल्या मुंबईचं संरक्षण करण्यासाठी अनेक ठिकाणी तोफ बसविण्यात आल्या होत्या. घाटकोपरच्या लायन्स चिल्ड्रन पार्कमध्ये बसविण्यात येणाऱ्या या दोन तोफा ऐतिहासिक आहेत. तेव्हा या दोन्ही […]
ADVERTISEMENT
मुंबई तक: ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातील दोन पोलादी तोफा आता पालिकेच्या पार्कमध्ये दिसणार आहेत. सुमारे 164 वर्षे या जुन्या तोफांमुळे आता पार्कमध्ये जाणाऱ्यांना ऐतिहासिक ठेवाही अनुभवता येणार आहे.
ADVERTISEMENT
ब्रिटिश काळात समुद्राने वेढलेल्या मुंबईचं संरक्षण करण्यासाठी अनेक ठिकाणी तोफ बसविण्यात आल्या होत्या. घाटकोपरच्या लायन्स चिल्ड्रन पार्कमध्ये बसविण्यात येणाऱ्या या दोन तोफा ऐतिहासिक आहेत. तेव्हा या दोन्ही तोफांना पार्कात बसविण्यापूर्वी त्यासाठी पुरातन वास्तू विभागाची संमती घेण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पुरातन वास्तू विभागातील जतन अभियंत्यांकडे मंजूरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या दोन्ही तोफा घाटकोपरच्या ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’मध्ये दिसणार आहेत.
हे वाचलं का?
या तोफांची वैशिष्ट्ये
या दोन्ही तोफा ३ मीटर लांबीच्या आहेत. त्या दोन्ही तोफा ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातील असून त्यांच्यावर १८५६ अशी नोंद करण्यात आली आहे. या दोन्ही तोफांवर असलेल्या नोंदीवरुन या दोन्ही तोफा १९५६ सालातील असल्याची नोंद त्यावर आढळते. त्याचबरोबर या तोफांच्या एका बाजूला रोमन लिपी मध्ये ‘एन सी पी सी’ अशी अक्षरे कोरण्यात आली आहेत. या दोन्ही तोफांची लांबी ३.१० मीटर असून तोफांचा आतील घेर हा ०.६४ मिटर आणि बाहेरील घेर १.१७ मीटर इतका आहे. या दोन्ही तोफांना नवी झळाळी देण्यासह त्या भव्य-दिव्य चबुतऱ्यावर पुनर्स्थापित करण्यात येणार आहेत. उद्यान अधिक्षक श्री. जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या अखत्यारीत असणा-या घाटकोपर पूर्व परिसरातील ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’ हे सन १९७१ पासून मुंबईकरांसाठी सुरू आहे. हे उद्यान ५५ हजार ८४३ चौरस फुटांच्या जागेत विकसित करण्यात आलं आहे. या उद्यानाला भेट देणाऱ्या प्रत्येकाला आता या तोफांसह ऐतिहासिक ठेवा पाहता येणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT