बहिणीच्या दुसऱ्या लग्नाला भावाचा विरोध, होणाऱ्या नवऱ्यासह बहिणीवरही चाकूने हल्ला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बीड शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पहिल्या पतीच्या निधनानंतर बहिणीच्या दुसऱ्या लग्नाला भावाचा विरोध होता. परंतू तरीही बहिणीने लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भावाने आपली बहिण आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्यावर चाकूने हल्ला केला आहे. बीड शहरातील सुभाष रोड परिसरात ही घटना घडली आहे.

ADVERTISEMENT

हा हल्ला केल्यानंतर आरोपी भाऊ फरार झाला असून त्याची बहिण आणि तिचा होणारा नवरा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सासरी पाठवत नसल्याने सासऱ्याने सुनेच्या वडिलांचा हात चावला, सीसीटीव्हीत घटना कैद

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी धनंजय बनसोडे याच्या बहिणीचं सोमवारी लग्न पक्क झालं होतं. आपल्या पहिल्या पतीच्या निधनानंतर धनंजयच्या बहिणीने योगेश बागडे या तरुणासोबत दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या खरेदीसाठी धनंजयची बहिण आपला होणारा नवरा योगेशसह सारडा कॅपिटल भागात खरेदीसाठी गेली होती. धनंजयचा या लग्नाचा विरोध होता.

रात्री साडेआठ वाजता धनंजय हा आपल्या दोन-तीन साथीदारांसह या भागात पोहचला. दुकानातून बाहेर पडणाऱ्या आपल्या बहिणीवर धनंजयने यावेळी चाकूने सपासप वार केले. याला विरोध करणाऱ्या योगेशवरही धनंजयने वार केले. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिक भयभीत झाले होते.

ADVERTISEMENT

‘ती’ हत्या घरगुती वादातून नाही! बायको आणि मुलीचं प्रेमप्रकरण समजल्यामुळे वडिलांनी गमावला जीव

ADVERTISEMENT

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे. आरोपी भाऊ धनंजयच्या अटकेसाठी पोलिसांनी पथकं रवाना केली आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT