Sangli: अवघ्या 15 दिवसाच्या रेड्याचे डागणीने काढले डोळे, कानही जाळला; अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

स्वाती चिखलीकर

ADVERTISEMENT

सांगली: सांगली (Sangli) जिल्ह्यातील टाकळी येथे अंधश्रद्धेचा (Superstition) अत्यंत अघोरी आणि घृणास्पद प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डागणीने एका रेड्याचे डोळे काढून त्याचा कान जाळण्याचा अतिशय धक्कादाय प्रकार घडला आहे. घरात भरभराट व्हावी या अंधश्रद्धेतून रेड्यावर अशाप्रकारचे अमानुष अत्याचार कारण्यात आले आहेत. दरम्यान, ही धक्कादायक माहिती समोर येताच ‘अॅनिमल राहत’ या संघटनेने असं भयंकर कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अंधश्रद्धेतून लिंबू, कोंबडी उतरवून टाकण्याचे प्रकार सर्रास घडत असतात. तसंच देवाच्या नावे रेडा आणि बोकडाचा बळी देण्याची प्रथा देखील सुरू आहेच. पण मिरज तालुक्यातील टाकळी येथे अंधश्रद्धेच्या अघोरी प्रकारातून 15 दिवसाच्या रेड्याचे डागणीने डोळे काढून कान जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

हे वाचलं का?

नागपूर : कोरोनातून बरं करण्याचा दावा करणाऱ्या ढोंगीबाबाला अटक

रेड्याचे डोळे आणि कान जाळून त्यास टाकळी बोलवाड येथील ओढ्यात दोन दिवसांपूर्वी अज्ञातानी सोडले होते. डोळे डागणीने जाळण्यात आल्याने रेडा पूर्णपणे अंध झाला होता.

ADVERTISEMENT

सदर रेडा इकडे तिकडे भटकत असताना टाकळी येथील शेतकरी सचिन कोठावळे यांच्या हा अघोरी प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी याबाबत तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांना माहिती दिली. ही माहिती मिळताच बाळासाहेब पाटील यांनी त्या रेड्यास आपल्या घरी आणले.

ADVERTISEMENT

बाळासाहेब पाटील यांनी ॲनिमल राहत संस्थेचे किरण नाईक, दिलीप शिंगणे यांना माहिती दिली. यावेळी जखमी रेड्यास अॅनिमल राहतच्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले. ॲनिमल राहत संस्थेने त्या रेड्यास उपचारासाठी नेले आहे.

अवघे पंधरा दिवस वय असलेल्या रेड्याचे डोळे काढून त्याचे कान जाळणे हा अघोरी प्रकार सातत्याने दिसून येत आहे. अशा अघोरी प्रकारातून जनावरांना वेदना पोहोचवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अॅनिमल राहतच्या किरण नाईक आणि बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.

समाज मंदिराच्या बांधकामाला विरोध, गावकऱ्यांचा पोलीस पाटलाच्या कुटुंबावर बहिष्कार

अंधश्रद्धा पाळणे हा गुन्हा असला तरी ग्रामीण भागात असे अनेक अघोरी प्रकार सातत्याने सुरू आहेत. ज्यामुळे मुक्या जनावरांवर अघोरी अत्याचार करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई होणं गरजेचं असल्याची मागणी आता होत आहे.

दरम्यान, या घटनेप्रकरणी आता अधिकृत तक्रार करणं गरजेचं आहे. कारण अधिकृत तक्रारीनंतरच याप्रकरणाचा सखोल तपास करुन पोलीस दोषींविरोधात कठोर कारवाई करु शकतात. तसंच कठोर कारवाईने या प्रकाराला आळा देखील बसू शकतो. त्यामुळे आता दोषींविरोधात कठोरातील कठोर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT