धावत्या गाडीत महिलेसोबत घडलं भयंकर; बाळाचा मृत्यू, ड्रायव्हरवर गंभीर आरोप
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एका महिलेसोबत धक्कादायक घटना घडलीये. या घटनेत 10 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाला असून, महिला जखमी झाली आहे. चालकाने विनयभंग केला आणि चिमुकलीला गाडीतून बाहेर फेकण्यात आल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. याप्रकरणी मांडवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून जाणाऱ्या इको वाहनातून पडून एका 10 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी […]
ADVERTISEMENT
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एका महिलेसोबत धक्कादायक घटना घडलीये. या घटनेत 10 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाला असून, महिला जखमी झाली आहे. चालकाने विनयभंग केला आणि चिमुकलीला गाडीतून बाहेर फेकण्यात आल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. याप्रकरणी मांडवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून जाणाऱ्या इको वाहनातून पडून एका 10 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी समोर आली होती. या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून, मयत बाळाच्या आईने चालकावर गंभीर आरोप केले आहेत.
महिलेने केलेल्या तक्रारीनुसार 10 महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू गाडीतून पडल्यामुळे नव्हे, तर चालकाने फेकून दिल्यानं झालाय. चालत्या वाहनात चालकाने विनयभंग केला. महिलेने विरोध केला. यावळी झालेल्या झटापटीत ड्रायव्हरने बाळाला गाडीबाहेर फेकल्याचे पीडित महिलेचं म्हणणं आहे.
हे वाचलं का?
मुंबईतली डेंजरस क्राईम स्टोरी! पतीला रोज थोडं थोडं मारणाऱ्या पत्नीबद्दल समोर आल्या हादरवणाऱ्या गोष्टी
नालासोपारा ते मनोर प्रवास करत असताना महिलेसोबत काय घडलं?
पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित 20 वर्षीय महिला ही कासा परिसरात राहणारी असून, ती आपल्या 10 महिन्यांच्या मुलीसह खासगी प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या इको गाडीतून नालासोपारा ते मनोर प्रवास करीत होती.
ADVERTISEMENT
दरम्यान, विरार फाट्याजवळील बावखल येथे गाडी आली असता चालकाने महिलेचा विनयभंग केला. झटापटीत चालकाने बाळाला गाडीबाहेर फेकून दिले. बाळाला बाहेर फेकल्यानंतर महिलेनंही धावत्या गाडीतून उडी घेतली. या घटनेत महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून बाळाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
मुंबई हादरली! महिलेवर सामूहिक बलात्कार; गुप्तांगाला सिगारेटचे चटके, Video बनवून दिली धमकी
विनयभंग झाल्याने आपण चालत्या गाडीतून उडी मारल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेनं मांडवी पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी चालक विजय कुशवाह (65) याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. याप्रकरणी आरोपीवर हत्या व विनयभंग केल्याप्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT