अनिल देशमुखांच्या दोन्ही PAचा CBI ने नोंदवला जबाब, माजी गृहमंत्र्यांचं काय होणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटीच्या आरोपानंतर आता याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (CBI)ने माजी गृहमंत्र्यांच्या दिशेने एक-एक पाऊल पुढे टाकण्यास सुरुवात केली आहे. कारण आता सीबीआयने अनिल देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांना (PA)जबाब नोंदविण्यासाठी बोलावलं आहे.

ADVERTISEMENT

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांचे दोन स्वीय सहाय्यक (पालांडे आणि कुंदन) हे दोघेही सीबीआयसमोर हजर झाले असून त्या दोघांचीही चौकशी सुरु असून सध्या त्यांचा जबाब सीबीआयचे अधिकारी नोंदवून घेत आहेत. त्यामुळे आता यापुढचा नंबर अनिल देशमुख यांचा असणार का? असा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे.

परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्याविरूद्ध वसुलीचे जे गंभीर आरोप केले आहेत त्याच आरोपांची सीबीआय प्राथमिक चौकशी करत आहे. काही दिवसांपूर्वी परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख हे एपीआय सचिन वाझे याच्याकडे 100 कोटीच्या वसुलीची मागणी करत असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. याच पत्रात परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यकांसोबत सचिन वाझे यांची काय बोलणी झाली होती याचा तपशील दिला होता.

हे वाचलं का?

दुसरीकडे NIA ने अटक केलेल्या सचिन वाझे याने देखील चार दिवसांपूर्वी कोर्टाला एक पत्र लिहलं होतं. ज्यामध्ये अनिल देशमुखांनी पैशाची मागणी केली होती असा आरोप केलाय. यावेळी देखील त्यांच्या स्वीय सहाय्यकाचं नाव घेण्यात आलं होतं.

हे सगळे आरोप लक्षात घेता आता सीबीआयने देशमुखांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना सीबीआयने जबाब नोंदविण्यसाठी बोलावलं आहे. त्यांच्या जबाबातून आता बऱ्याच गोष्टी समोर येणार आहेत. अशावेळी या दोन्ही व्यक्ती सीबीआयसमोर काय बोलणार यावर अनिल देशमुखांचं भवितव्य अवलंबून असणार आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, 8 एप्रिलला सीबीआयने NIA च्या अटकेत असलेले सचिन वाझे, ACP संजय पाटील यांच्यासह मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग आणि याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांचा जबाब नोंदवला होता. . आता या चारही जणांच्या जबाबानंतर सीबीआयने आणखी एक पाऊल पुढे टाकत अनिल देशमुख यांच्या स्वीय सहाय्यकांचा जबाब नोंदवला आहे.नेमकं प्रकरण काय हे अगदी थोडक्यात जाणून घ्या:

ADVERTISEMENT

नेमकं प्रकरण काय हे अगदी थोडक्यात जाणून घ्या:

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली संशयित स्कॉर्पिओ कार, मनसुख हिरेन यांचा मृत्यू, API सचिन वाझेंना झालेली अटक आणि याच प्रकरणात परमबीर सिंग यांची झालेली उचलबांगडी हा या संपूर्ण प्रकरणाचा पूर्वाध आहे. पण या प्रकरणाचा उत्तरार्ध सुरु झाला तो परमबीर सिंग यांच्या बदलीनंतर.

परमबीर सिंग यांना होमगार्ड विभागात टाकून हेमंत नगराळे यांना मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली. या बदलीनंतर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्याकडे १०० कोटींची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप केला. या व्यतिरिक्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी सुरु असलेल्या रॅकेटचाही परमबीर यांनी आपल्या पत्रात उल्लेख केला होता. या सगळ्या प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी यासाठी परमबीर सिंग यांनी कोर्टात धाव घेतली होती. ज्यावर सुनावणी करत कोर्टाने या प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT