हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS बिपीन रावतांचा मृत्यू, घटनास्थळावरील Exclusive फोटो
तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. ज्यामध्ये सीडीएस बिपीन रावत यांच्यासह तब्बल 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. MI सीरीजचं हे लष्कराचं हेलिकॉप्टर कोईम्बतूर ते सुलूर एअरफोर्स बेसहून कुन्नूरच्या वेलिंगटनला जात असताना अचानक त्याचा अपघात झाला. यावेळी सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि लष्करातील इतर अधिकारी देखील हेलिकॉप्टरमध्ये होते. दरम्यान, या अपघाताचं […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. ज्यामध्ये सीडीएस बिपीन रावत यांच्यासह तब्बल 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
हे वाचलं का?
MI सीरीजचं हे लष्कराचं हेलिकॉप्टर कोईम्बतूर ते सुलूर एअरफोर्स बेसहून कुन्नूरच्या वेलिंगटनला जात असताना अचानक त्याचा अपघात झाला.
ADVERTISEMENT
यावेळी सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि लष्करातील इतर अधिकारी देखील हेलिकॉप्टरमध्ये होते.
ADVERTISEMENT
दरम्यान, या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण होते. ज्यापैकी तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीररित्या जखमी असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
हा अपघात एवढा भीषण होता की, हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर चारही बाजूला आगीचे आणि धुराचे लोट उठले होते.
जनरल बिपीन राव हे देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते. याआधी ते लष्करप्रमुख होते.
जनरल बिपीन रावत हे 1978 साली लष्कराच्या 11व्या गोरखा रायफल्सच्या पाचव्या बटालियनमध्ये कमिशन मिळालं होतं.
27 सप्टेंबर 2019 मध्ये ते चीफ ऑफ स्टाफ कमिशनचे चेअरमन होते. त्यानंतर 31 डिसेंबर 2019 रोजी त्यांची देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती झाली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT