कुत्रे सोडल्यासारख्या तपास यंत्रणा अंगावर सोडल्या जात आहेत – पृथ्वीराज चव्हाणांचा केंद्रावर हल्लाबोल
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर गेल्या काही दिवसांपासून तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचीही १०० कोटींच्या वसुलीप्रकरणाच चौकशी सुरु आहे. ईडीने अनिल देशमुख यांनी ४ कोटी २० लाखांची संपत्ती जप्त केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा होत असलेल्या गैरवापराबद्दल काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी […]
ADVERTISEMENT
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर गेल्या काही दिवसांपासून तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचीही १०० कोटींच्या वसुलीप्रकरणाच चौकशी सुरु आहे. ईडीने अनिल देशमुख यांनी ४ कोटी २० लाखांची संपत्ती जप्त केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा होत असलेल्या गैरवापराबद्दल काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.
ADVERTISEMENT
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. “कुत्रे सोडल्यासारख्या तपास यंत्रणा अंगावर सोडल्या जात आहेत. दोषी ठरल्यावर कारवाई करा. आधीच्या काळात असं होतं नव्हतं. एकनाथ खडसेंनी पक्ष बदलल्यानंतर त्यांच्यावर कारवाईला सुरुवात झाली. भाजपमध्ये ते धुतल्या तांदळासारखे होते का”? असा सवालही पृथ्वीराज चव्हाणांनी केंद्र सरकारला विचारला आहे.
CM Uddhav Thckeray लोकप्रिय ठरले, त्यांना पंतप्रधान करा! ज्येष्ठ काँग्रेस नेत्याचं मत
हे वाचलं का?
दरम्यान, अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केल्यानंतर ईडीने अनिल देशमुख यांच्या काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी छापे टाकले. तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांच्या विरूद्ध देखील ईडीने कारवाई करण्यास सुरवात केलीय. त्यामुळे केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करतंय असा आरोप आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार करण्यात येतोय.
Anil Deshmukh पळाले तर नाही ना? ED कारवाईनंतर किरीट सोमय्यांनी व्यक्त केली शंका
ADVERTISEMENT
आपल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना पृथ्वीराज चव्हाणांनी मोदी सरकारच्या धोरणांवरही टीका केली. मोदी सरकारने सरकार स्थापनेपासून काढलेल्या ३२ ते ३५ लाख कोटी रुपयांचे कर्जाचा तोटा भरुन काढण्यासाठी कर वाढ केली जात आहे. मोदी सरकार हा तोटा भरून काढण्यासाठी कर्ज तर काढतंय. त्याचबरोबर देशातल्या बँका विकणं, कंपन्या विकणं, एलआयसीचे खासगीकरण करणे असेही प्रकार सुरू असल्याचं देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT