तसाच प्रकार उद्धव ठाकरेंच्या बाबतीत घडलाय; चंद्रकांत पाटील यांनी डागलं टीकास्त्र

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

‘नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना चौथ्या स्थानावर गेल्यामुळे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हताश झाले आहेत. आपल्या पक्षाचा ऱ्हास होताना पाहून आलेली निराशा लपविण्यासाठी ते भाजपावर टीका करून थयथयाट करत आहेत,’ असं टीकास्त्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शिवसेनेवर डागले.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना उत्तर दिलं. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कालचं (२३ जानेवारी) भाषण हे आधीच्या दसऱ्याच्या भाषणासारखंच होतं. एखाद्या माणसाला आपली चूक समजली पण मान्य करता येत नसेल, तर निराशेतून तो थयथयाट करतो आणि दुसऱ्याला चूक म्हणतो. तसाच प्रकार उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत घडला आहे’, असा टोला पाटील यांनी लगावला.

मिरच्या झोंबल्या म्हणूनच खुलासा करावा लागला; संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर

हे वाचलं का?

‘नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना चौथ्या स्थानावर गेली आहे. तब्बल ४१ नगरपंचायतींमध्ये शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही. या निराशेतून सोडणार नाही, दाखवून देईन. आमच्या जिवावर तुम्ही मोठे झालात, असे मुख्यमंत्री बोलत आहेत. पण मुख्यमंत्र्याच्या तोंडी ही भाषा शोभत नाही’, असंही पाटील म्हणाले.

‘आपण हिंदुत्व सोडले नाही, असं उद्धव ठाकरे यांना सांगायचं असेल तर त्यांनी ते काँग्रेसला सांगावं. मौलाना आझाद महामंडळाला निधी वाढवून देता पण अण्णासाहेब पाटील महामंडळाला मात्र निधी देत नाही. त्यामुळे ज्या अल्पसंख्यांकांचा अनुनय सुरू केला आहे. त्यांनाही हिंदुत्व सोडले नाही असं सांगावं, असा कोपरखळी चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लगावली.

ADVERTISEMENT

“शिवबंधनाचे किती धागे तुटले? किती निष्ठावंत दुरावले हेही पहा”

ADVERTISEMENT

‘काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पंतप्रधानांविषयी ज्या प्रकारे बोलत आहेत ते पाहता पटोले यांच्या मानसिक तपासणीची गरज आहे. त्यांच्या राजकारणाचा स्तर किती घसरला आहे, याचा काँग्रेस पक्षानं विचार करावा. नाना पटोले यांच्या वृत्तीचा आपण निषेध करतो. भाजपातर्फे राज्यात ठिकठिकाणी पटोले यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे’, असंही ते म्हणाले.

‘मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीचा कोणताही प्रस्ताव नाही व तसा काहीही निर्णय झालेला नाही’, असंही पाटील यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT