गुजरात : निवडणूक निकालानंतर बदलला विचार; ‘आप’ आमदाराचा भाजपला पाठिंबा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अहमदाबाद : गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने सलग सातव्यांदा निवडणूक जिंकली. 1980 नंतर गुजरातमध्ये भाजपचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. 150 चे टार्गेट घेऊन चालणाऱ्या भाजपला गुजरातच्या जनतेने 156 जागा दिल्या. गुजरातच्या भूमीवर यापूर्वी असा बंपर जनादेश कोणालाही मिळाला नाही आणि 27 वर्षे गुजरातमध्ये भाजपचे सरकार असताना हा जनादेश मिळाला आहे.

ADVERTISEMENT

आपचे आमदार देणार भाजपला बाहेरून पाठिंबा

गुजरातच्या या निकालानंतरही भाजपसाठी आनंदाच्या बातम्यांचा क्रम सुरूच आहे. आता आम आदमी पक्षाच्या एका आमदाराने भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. भाजपला विरोध म्हणून आलेल्या आम आदमी पक्षाचे आमदारचं आता भाजपला बाहेरून पाठिंबा देणार आहेत.

गुजरातमधील विसावादारमधून आपच्या तिकिटावर विजयी झालेल्या भूपत भयानी यांनी आता भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी दुपारपर्यंत भयानी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे वृत्त होते, मात्र अचानक त्यांनी भाजपमध्ये येण्यास नकार देत पक्षाला बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली. जनतेला विचारल्यानंतरच हा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे वाचलं का?

प्रत्यक्षात आम आदमी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक जिंकलेले भयानी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांना विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल. अशा स्थितीत त्यांच्या जागेवर फेरनिवडणूक होणार आहे. त्यामुळे भाईनी यांनी पक्षात न जाता भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय आणखी तीन अपक्ष आमदारांनीही भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

आमदारांचा हा निर्णय भाजप सरकारसाठी शपथविधीपूर्वी अत्यंत आनंदाची बातमी मानली जात आहे. ज्या तीन आमदारांनी पाठिंबा दिला आहे त्यात बायडमधून धवल झाला, धानेरामधून मावजी देसाई आणि वाघोडियातून धर्मेंद्र वाघेला यांचा समावेश आहे. भाजपकडून तिकीट न मिळाल्याने धवलसिंग झाला आणि मावजी देसाई यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि विजयी झाले.

ADVERTISEMENT

गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 182 जागा आहेत. यापैकी भाजपने 156 जागा जिंकल्या. काँग्रेसला राज्यात 17 जागांवर समाधान मानावे लागले. तर आम आदमी पक्षाला केवळ ५ जागा जिंकता आल्या. दुसरीकडे विरोधकांच्या पराभवाबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वेळी 41 टक्के मते मिळविणाऱ्या काँग्रेसचा यंदा 27 टक्के वाटा घसरला असून आम आदमी पक्षाने 13 टक्के वाटा काबीज केला आहे.

ADVERTISEMENT

मतांची टक्केवारी

हे आकडे पाहता, असे म्हणता येईल की पीएम मोदींच्या घोषणेनुसार भूपेंद्रने ‘नरेंद्र’चे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. भूपेंद्र पटेल सलग दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आता एकीकडे गुजरातमध्ये भाजपने शानदार विजयाचा इतिहास रचला आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्षांना सन्माननीय विरोधी पक्षाची भूमिकाही बजावता येत नाहीये. यावेळच्या निकालात भाजपला ५२ टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. तर काँग्रेसला जवळपास 27 टक्के आणि आम आदमी पक्षाला सुमारे 13 टक्के मते मिळाली आहेत.

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपला जवळपास 3 टक्के अधिकचे मते मिळाली आहेत. काँग्रेसला 14 टक्के मतांचे मोठे नुकसान झाले असून आम आदमी पक्षाला 13 टक्के मतांचा मोठा फायदा झाला आहे. गुजरातमध्ये सरकार स्थापनेचा दावा करणाऱ्या केजरीवाल यांच्या पक्षाला दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.

काँग्रेसच्या पराभवाचे अनेक कारणं

काँग्रेसच्या कामगिरीवर नजर टाकली, तर काँग्रेसनेच अशा अनेक चुका केल्या आहेत, त्यामुळे त्यांची अत्यंत निराशाजनक कामगिरी दिसून आली आहे. या निवडणुकीत पक्षाने निश्चित रणनीतीनुसार स्थानिक नेतृत्वावर अधिक लक्ष केंद्रित केले होते. 2017 प्रमाणे, राहुल गांधींचा प्रचार दिसला नाही, प्रियंका गांधी आणि इतर बडे काँग्रेस नेते देखील गुजरातच्या मातीवर कमी सक्रिय होते. त्यामुळे जनतेलाही काँग्रेसवर विश्वास दाखवता आला नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT