राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ अडचणीत : उद्योगपतीला धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती ललित टेकचंदानी यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपांखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेकचंदानी यांनी चेंबुर पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरुन भारतीय दंड संहितेच्या कलम 506 (2) (धमकी देणे) आणि 34 नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

ललित टेकचंदानी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितल्याप्रमाणे, त्यांनी भुजबळ यांना त्यांच्या मोबाईलवर 2 व्हिडिओ पाठवले होते. ज्यात भुजबळ यांनी हिंदू धर्माचा अपमान करणारे भाषण केले होते. मात्र व्हिडिओ पाठवल्यानंतर लगेचच टेकचंदानी यांना धमक्या देणारे फोन आणि मेसेज येऊ लागले. ज्यात त्यांना शिवीगाळही करण्यात आली आहे. दरम्यान, टेकचंदानी यांनी भुजबळ यांना ज्या नंबरवर संबंधित व्हिडीओ पाठवले तो नंबर, तसेच ज्या नंबरवरुन धमक्या आणि मेसेजेस आले तो नंबर हे पोलिसांना दिले आहेत.

‘तू भुजबळ साहेबांना मेसेज पाठवतो, तुझ्या घरी येऊन गोळ्या टाकतो. बाहेरचे लोक लावतो, बाहेरचे दुबईचे. कळलं ना. भुजबळ साहेबांना मेसेज करणं महागात पडेल, कोण आहे तु, कुठे राहतो, माज करतो का? काय प्रॉब्लेम आहे? अशा शब्दात धमक्या देण्यात आल्या असल्याच टेकचंदानी यांनी तक्रारीत म्हटले आहे. हे मेसेज आणि फोन कॉल्स कोणी केले यांचा पोलीस तपास करत आहे.

हे वाचलं का?

खासदार राहुल शेवाळे आणि आमदार अमित साटम यांचे ट्विट :

खासदार राहुल शेवाळे आणि अंधेरीचे आमदार अमित साटम यांनी देखील या प्रकरणी ट्विट करुन भाष्य केले आहे. खासदार म्हणाले की, चेंबूरचे व्यापारी ललित टेकचंदानी यांना दिलेल्या धमकीमागे कोण आहे? या धमकीला माजी मंत्र्यांचे समर्थन आहे काय? ही धमकी कुणाच्या इशाऱ्यावर दिली गेली? या सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेसमोर यायला हवीत. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT