‘अरे संजय बेटा, तू थांब..’, भुजबळांच्या विधानाने घमासान, अजितदादा मदतीला
छगन भुजबळ यांनी विधानसभेत बोलताना मुंबईबद्दल केलेल्या एका विधानावरून जोरदार घमासान पाहायला मिळालं. आधी मुंबईबद्दल केलेला शब्द मागे घेण्यावरून भाजपचे आमदार आक्रमक झाले. त्यानंतर भुजबळांनी खाली बस म्हटल्याच्या विधानावरही योगेश सागर यांनी आक्षेप घेतला. दोन्ही वेळी विरोधी पक्षनेते अजित पवार छगन भुजबळाच्या मदतीला धावले. छगन भुजबळ सभागृहात म्हणाले, ‘मुंबईतील हवा रिफायनरीमुळे जास्त खराब होतेय की, […]
ADVERTISEMENT
छगन भुजबळ यांनी विधानसभेत बोलताना मुंबईबद्दल केलेल्या एका विधानावरून जोरदार घमासान पाहायला मिळालं. आधी मुंबईबद्दल केलेला शब्द मागे घेण्यावरून भाजपचे आमदार आक्रमक झाले. त्यानंतर भुजबळांनी खाली बस म्हटल्याच्या विधानावरही योगेश सागर यांनी आक्षेप घेतला. दोन्ही वेळी विरोधी पक्षनेते अजित पवार छगन भुजबळाच्या मदतीला धावले.
ADVERTISEMENT
छगन भुजबळ सभागृहात म्हणाले, ‘मुंबईतील हवा रिफायनरीमुळे जास्त खराब होतेय की, बिल्डिंगच्या कामामुळे खराब होतेय? त्याच्यात तरी मार्ग काढा. मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, असं लोक पूर्वी म्हणत असत. अंडी ठिके, पण कोंबडीच कापून खाऊ नका ना.’
‘रेकॉर्ड काढा’, अजित पवार गिरीश महाजनांवर चिडले, फडणवीसांची मध्यस्थी
हे वाचलं का?
भाजपच्या आमदारांवर भुजबळ भडकले…
भाजपच्या आमदारांनी हरकत घेतली. त्यावर भुजबळ म्हणाले, पूर्वी असं म्हणायचे. बरं ठिके. शब्द मागे. शब्द मागे घेतला आता. मला माहितीये काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही ते. तुम्हाला ते समजणार नाही.’
‘भुजबळांना सांताक्लॉजची टोपी’, भातखळकरांचं ट्विट जयंत पाटलांनी दाखवलं, फडणवीस म्हणाले…
ADVERTISEMENT
आमदार मनिषा चौधरी म्हणाल्या, ‘ज्यांनी मुंबई महापालिकेचं नेतृत्व केलंय. असे जर कोंबडी म्हणत असतील, तर हा मुंबईकरांचा अपमान आहे. हा मुंबईकरांचा अपमान आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. हा शब्द त्यांनी मागे घ्यावा आणि त्यांनी मुंबईकरांची माफी मागावी,’ अशी हरकत भाजपच्या आमदाराने घेतली.
ADVERTISEMENT
त्यानंतर पुन्हा बोलताना छगन भुजबळ म्हणाले, ‘तुमच्यापेक्षा जास्त अभिमान मला आहे. मी मुंबई महापालिकेचा दोन वेळा महापौर होतो. तुम्ही मला काय सांगता. एक वाक्प्रचार आहे. मुंबईबद्दल शब्द वापरल्याचा त्रास होतो.’
विधानपरिषद: खडसे-फडणवीस भिडले, मुख्यमंत्री शिंदे ठरले निमित्त!
अजित पवारांची मध्यस्थी गिरीश महाजनांना खडेबोल
सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार घमासान सुरू असताना अजित पवारांनी मध्यस्थी केली. अजित पवार म्हणाले, ‘आपण तालिका अध्यक्ष म्हणून आपण बसला आहात. रेकॉर्ड तपासून बघा. भुजबळांनी एक उदाहरण देताना तसा उल्लेख केला, पण लगेच ते शब्द त्यांनी मागे घेतले आहेत. अरे संजय बेटा, थांब. माझं ऐक जरा,’ अशा शब्दात सुनावलं.
त्यानंतर भाजपचे आमदार योगेश सागर यांनी भुजबळाच्या आणखी एका विधानावर आक्षेप घेतला. ‘छगन भुजबळ मनिषा चौधरी यांना बस खाली म्हणाले. त्यांनी महिलांचा अपमान केला. त्यामुळे त्यांनी माफी मागावी,’ अशी मागणी आमदार सागर यांनी केली.
आमदार योगेश सागर यांना अजित पवार काय म्हणाले?
सागर यांनी माफीची मागणी केल्यानंतर अजित पवार पुन्हा उठले. ‘सगळेच सभागृहात आहेत. आमदार सागर हे का बोलताहेत मला काही कळत नाही. मी बघत होतो, ते (छगन भुजबळ) म्हणत होते, खाली बसा. गिरीश महाजनजी तुम्हीही सामंजस्य भूमिका घ्या. खाली बसा म्हणाले. ते ज्येष्ठ नेते आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून काम केलंय. विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं. महिलांना नेहमी मानसन्मान देतात. तुम्ही असं कसं बोलता?’
विधानसभेत अजित पवारांचा पारा चढला, फडणवीसांनी दाखवला आरसा
‘वाद वाढवू नका. विषय सुरू करा. मुंबई सर्वांची आहे. मुंबईला कुणीही अपमानित करू शकत नाही. मुंबईबद्दल कुणीही अपशब्द बोलू शकत नाही. आपल्या सगळ्यांची मुंबई आहे. सभागृहाला विनंती आहे की, आपण बघितलं आहे. या सभागृहात 33 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला. 50 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला. महिलांना नेहमी सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. पुरूषांच्या बरोबरीने संधी मिळाली पाहिजे, हीच आमची भूमिका राहिलीये. तरी देखील काही लोकांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगीरी व्यक्त करतो. काम सुरू करा.’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT