कुटुंबाची जबाबदारी सांभाळू न शकलेले मुख्यमंत्री लॉकडाऊनसाठी उतावीळ: राणे

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

मुंबई: ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी अशी घोषणा देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरातील सर्व जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे स्वत:च्या कुटुंबाची जबाबदारी देखील सांभाळू न शकलेले मुख्यमंत्री राज्याची काय जबाबदारी सांभाळणार? सध्या मुख्यमंत्री हे लॉकडाऊनसाठी उतावीळ झाले आहेत.’ अशी टीका भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आता महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. अशावेळी नारायण राणे यांनी आज (2 एप्रिल) पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

‘राज्यात कोरोना वाढतोय त्यामुळे मुख्यमंत्री राज्यात लॉकडाऊन करण्याच्या मनस्थितीत आहे. पण त्यांचे दोन मित्र पक्ष मात्र लॉकडाऊनसाठी उतावीळ झालेले नाहीत. पण मुख्यमंत्री मात्र लॉकडाऊनसाठी उतावीळ आहेत. कोरोना सुरु झाला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी घोषणा दिली होती की, ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’. पण आता ही घोषणा ते बंद करतील कारण ही जबाबदारी पार पाडण्यास ते कमी पडले. कारण त्यांच्या घरातील सगळेच कोरोनाग्रस्त झाले आहेत.’ असा टोलाही राणेंनी यावेळी लगावला आहे.

हे वाचलं का?

‘महाराष्ट्र आर्थिक पातळीवर अधोगतीकडे गेलाय’

‘राज्यातील कोरोना कमी होण्याऐवजी वाढला कारण मुख्यमंत्र्यांचं धोरणच चुकीचं आहे. यांच्याकडे आरोग्याच्या बाबतीत नेमक्या काय यंत्रणा आहेत? अन्य राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी झाले पण महाराष्ट्रात का वाढले आहेत म्हणून आता हे लोकं लॉकडाऊनची धमकी देत आहेत. पण लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न कसा सुटणार, दोन वेळेचं जेवण मुख्यमंत्री घरी पाठवणार आहेत का?’

ADVERTISEMENT

‘महाराष्ट्र आर्थिक पातळीवर अधोगतीकडे गेला आहे. याला कारण हे मुख्यमंत्री, सरकार आहे. सगळे व्यवसाय कोलमडले आहेत. याची चिंता यांना आहे की नाही?’ असा सवाल करत राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन लागणार का? मुख्यमंत्र्यांची संध्याकाळी महत्वाची बैठक

‘वाझेला पुन्हा पोलीस दलात घेण्यात शिवसेनेची मोठी भूमिका’

‘राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. कारण अधिकारी आणि पोलीस यांचं एकच काम या सरकारच्या मंत्र्यांना कमावून द्यायचं. जशी सचिन वाझेची जबाबदारी होती की, महिन्याला 100 कोटी जमवायचे आणि अनिल देशमुखांकडे नेऊन द्यायचे. एका एपीआयच्या सात ते आठ गाड्या कशा असू शकता? तो ऑबेरॉयमध्ये कसा काय राहू शकतो?’

‘भाईंदरमध्ये एका बाईच्या घरी NIA छापा मारला.ही तीच बाई आहे जी वाझेसोबत सीसीटीव्हीमध्ये दिसली होती. अशा वाझेला पुन्हा पोलीस दलात घेण्यास शिवसेनेचा पाठिंबा होता. वाझेला माहिती होतं आपण पैसे देतो मंत्र्याला काही झालं तरी आपल्याला ते वाचवणारच. मग का नाही तो वाट्टेल ते करणार, लोकांचे खून पाडणार. काय त्या वाझेची वट..’

‘भाजपच्या नेते काय करतायेत, राणे काय करतायेत यासाठी पोलीस लावले आहेत कामाला. मी तर म्हणतो नवी मुलं भरती करा. पण त्यांना वाझे बनवू नका. कशासाठी हे सगळं करता, राज्य चालवा ना.. दिलंय ना लोकांनी… लोकांनी नाही पवार साहेबांनी दिलं आहे.’ अशी टीकाही राणेंनी यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंवर केली.

…या सर्वांना राज्याचे मुख्यमंत्री जबाबदार, त्यांनी राजीनामा द्या – नारायण राणे

‘राज ठाकरे हे काही ठाकरे नाहीत का?, त्यांना स्मारकाच्या भूमीपूजनाला का नाही बोलावलं?’

‘बाळासाहेबांच्या स्मारकाचं भूमीपूजन झालं. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी या स्मारकासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळवून दिल्या होत्या. पण भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला त्यांना आमंत्रण नव्हतं. ठाकरे कुटुंबाने हा भूखंड विकत घेतलाय का? एवढंच काय एकनाथ शिंदे यांचं नाव देखील जाहीरातीत नाही. खरं तर विरोधी पक्ष नेत्याला मुख्यमंत्र्यांप्रमाणेच दर्जा असतो. मुख्यमंत्र्यांचं हे अतिशय संकुचित राजकारण आहे. राज ठाकरे काय ठाकरे नाहीत? त्यांचं नाव का गाळलं?’ असा सवालही राणेंनी यावेळी उपस्थित केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT