महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन लागणार का? मुख्यमंत्र्यांची संध्याकाळी महत्वाची बैठक

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

एकीकडे महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लावलं जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासन आणि राजकीय नेत्यांकडून यासंदर्भात वेगवेगळी विधानं येत असली तरीही राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज संध्याकाळी साडेचार वाजता वर्षा या आपल्या अधिकृत निवासस्थानावर बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लावण्याबद्दल निर्णय घेऊ शकतात असं समजतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री स्वतः सोशल मीडियावरुन हे निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या शहरांत आज रात्रीची संचारबंदी लागू आहे. बीड, नागपूर, नांदेड मध्ये निर्बंधांसह लॉकडाउन आहे. मुंबईत गुरुवारी ८ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळल्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. यात चिंतेची बाब म्हणजे २७ मार्चपासून राज्यात मृत्यूंची संख्या ही १०० च्या खाली आलेली नाहीये. त्यामुळे ही रुग्णांच्या संख्येत अशीच वाढ होत राहिली तर भविष्यात आरोग्यव्यवस्थेवर मोठा ताण येईल अशी भीती याआधीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली होती. त्यामुळे आजच्या बैठकीत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

सातारा : कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून बगाड यात्रेचं आयोजन, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

हे वाचलं का?

आजच्या बैठकीत लॉकडाउन किंवा निर्बंध लावण्याबद्दल निर्णय झाला तर ते काहीसे अशा स्वरुपातले असू शकतील –

  • प्रवासी बससेवा ५० टक्के क्षमतेने सुरु राहु शकते

ADVERTISEMENT

  • चित्रपटगृह, नाट्यगृह, मॉल्स पूर्णपणे बंद केले जाऊ शकतात

  • ADVERTISEMENT

  • धार्मिक स्थळही बंद केली जाऊ शकतात

  • लग्न समारंभाचे नियम आणखी कडक केले जाण्याची शक्यता आहे

  • हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरु राहण्याची शक्यता आहे

  • दुकानांमध्येही एकावेळी ५ पेक्षा जास्त लोकांना परवानगी मिळणार नाही.

  • मुंबईतील धार्मिक स्थळं, मॉल बंद होण्याची शक्यता, महापौर किशोरी पेडणेकरांचे संकेत

    दरम्यान, महाराष्ट्रातील पाच जिल्हे असे आहेत की, जिथे कोरोना व्हायरसचा अक्षरश: स्फोट झाला आहे. कारण आजच्या घडली या पाच जिल्ह्यात मिळून एकूण 2 लाख 46 हजार 655 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रात 3 लाख 66 हजार 533 रुग्ण आहे. त्यामुळे आता आपल्याला कल्पना येईल राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये कोरोनाने केवढ्या मोठ्या प्रमाणात थैमान घातलं आहे.

    ‘या’ 5 जिल्ह्यात आहेत सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण (Active Patient)

    • पुणे- 64599

    • मुंबई- 54807

    • नागपूर – 48806

    • ठाणे- 42151

    • नाशिक – 36292

    1. पुणे – राज्यात कोरोनाची सर्वात भयंकर परिस्थिती ही पुण्यात आहे. कारण पुण्यात कोरोनाचा संसर्ग हा अत्यंत झपाट्याने वाढत आहे. त्यातही राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत. पुण्यात सध्या 64 हजार 599 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत पुण्यात कोरोनामुळे 8343 जणांना आपला प्राणही गमवावा लागला आहे.

    2. मुंबई – मुंबईत कोरोनाची स्थिती सध्या अधिक बिघडत चालली आहे. तसंच अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे सध्या मुंबईत 54 हजार 807 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. पण मृतांच्या बाबतीत मुंबई मात्र सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. कारण आतापर्यंत मुंबईत 11 हजार 708 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    मुंबईत Corona चा कहर दिवसभरात ८ हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह

    3. नागपूर – अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत नागपूर सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. कारण आता नागपूरमध्ये 48 हजार 806 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे 15 मार्चपासून कडक लॉकडाऊन देखील करण्यात आला होता. मात्र त्यानंतर लॉकडाऊन काहीशी सूट देण्यात आली होती. दरम्यान, गेल्या 24 तासात नागपूरमध्ये 60 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

    4. ठाणे – मुंबईच्या सर्वात जवळ असणाऱ्या ठाणे जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णांची संख्या बरीच वाढत आहे. अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत ठाणे जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागतो. कारण इथे सध्याच्या घडीला 42 हजार 151 कोरोना रुग्ण आहेत. तर मृतांच्या बाबतीत ठाणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. कारण आतापर्यंत 5,980 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

    5. नाशिक – कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात नाशिक जिल्ह्यात संसर्ग हा फारच कमी असल्याचं दिसून आलं होतं. पण मागील काही महिन्यात येथे कोरोनाच संसर्ग झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात 36 हजार 292 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT