Dasara Melava : “एकीकडे पक्ष आहे तर अध्यक्ष नाही, दुसरीकडे अध्यक्ष आहे पण पक्षच नाही”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेना ही लाखो शिवसैनिकांच्या कष्टातून उभी राहिली आहे. तुम्ही (उद्धव ठाकरे) शिवसेना कुणाच्याही दावणीला बांधू शकत नाही. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की तुम्ही सगळे शिवसैनिक आहात म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे. पण हे बोलतात की लाखो गेले, आमदार, खासदार गेले तरी मीच आहे. आता तरी डोळे उघडा असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. बीकेसीमधल्या दसरा मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

ADVERTISEMENT

काँग्रेस आणि शिवसेनेवर एकनाथ शिंदेंची टीका

काँग्रेसवाल्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली, त्या पक्षाची अवस्था वाईट आहे. त्यांच्याकडे पक्ष आहे पण अध्यक्ष नाही आणि इथे अध्यक्ष आहे पण पक्ष नाही. अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी आपल्या दसरा मेळाव्यात भाषणात उद्धव ठाकरेंसह काँग्रेसचीही खिल्ली उडवली. मुंबईतल्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते.

Dasara Melava: “बाळासाहेबांचा विचार मोडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा लाज वाटली नाही का?”

हे वाचलं का?

तुम्हाला बाप विकणारी टोळी म्हणायचं का?

बाप चोरला असा आरोप माझ्यावर केला जातो आहे.. पण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली देऊन तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. मग तुम्हाला बाप विकणारी टोळी म्हणायचं का? आम्हाला शिवतीर्थावर संमती मिळाली नसली तरीही आजच्या गर्दीने खरी शिवसेना कुठे आहे ते सिद्ध झालं आहे त्यामुळेच या विराट सभेपुढे मी नतमस्तक झालो असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस राष्ट्रवादीकडे उद्धव ठाकरेंनी शिवसेना गहाण टाकली

हजारो शिवसैनिकांनी घाम गाळून, रक्त सांडून शिवसेना पक्ष उभा केला. मात्र तुम्ही (उद्धव ठाकरे) तो पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे गहाण टाकला. तुम्ही (उद्धव ठाकरे) स्वतःच्या स्वार्थासाठी या पक्षाचा उपयोग केला. आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांसाठी, हिंदुत्वासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही भूमिका घेतली. जाहीरपणे घेतली, लपून छपून घेतली नाही असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

ADVERTISEMENT

आम्ही गद्दार नाही तुम्हीच गद्दार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं उद्धव ठाकरेंना खणखणीत प्रत्युत्तर

ADVERTISEMENT

मी मुख्यमंत्री झाल्यापासून मागचे तीन महिने राज्यात फिरतो आहे. लोकांचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे. आम्ही जर बेईमानी केली असती तर इतका मोठा प्रतिसाद आम्हाला दिला असता का? शिवसेना ना एकनाथ शिंदेंची ना उद्धव ठाकरेंची आहे. ही शिवसेना फक्त बाळासाहेब ठाकरेंची आणि त्यांच्या विचार मानणाऱ्यांचीच आहे अशीही घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली.

वारसा विचारांचा असतो, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा जपणारे

वारसा हा विचारांचा असतो, आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा जिवापाड जपला आहे. विचारांचे पाईक आणि विचारांचे शिलेदार कोण ? हे महाराष्ट्राला कळलं आहे. गद्दारी झाली आहे गद्दारी झाली आहे हे सातत्याने ऐकवलं जातं आहे. मात्र ती गद्दारी आत्ता नाही तर २०१९ ला झाली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी झाली, लोकांच्या जनमताशी गद्दारी झाली ती २०१९ ला झाली आहे असाही टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. गद्दार आणि खोके याशिवाय आता तुमच्याकडे (उद्धव ठाकरे) बोलण्यासारखं काहीही नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT