Uddhav Thackeray Live: आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राला संबोधित करणार, Lockdown शिथिल करणार?
मुंबई: राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात राहावी यासाठी साधारण दोन महिन्यापासून लॉकडाऊन लागू आहे. मात्र, आता हळूहळू कोरोनाची रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन हटवावा किंवा त्यासंबंधी काही नियम तरी शिथिल करण्यात यावे अशी मागणी सातत्याने होते आहे. याच सगळ्यादरम्यान आता एक महत्त्वाची बातमी […]
ADVERTISEMENT
मुंबई: राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात राहावी यासाठी साधारण दोन महिन्यापासून लॉकडाऊन लागू आहे. मात्र, आता हळूहळू कोरोनाची रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन हटवावा किंवा त्यासंबंधी काही नियम तरी शिथिल करण्यात यावे अशी मागणी सातत्याने होते आहे. याच सगळ्यादरम्यान आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (30 मे 2021) रोजी रात्री 8.30 वाजता सोशल मीडिया लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांना संबोधित करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री नेमकी कोणती घोषणा करणार याकडेच अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण अत्यंत झपाट्याने वाढल्याने साधारण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात लॉकडाऊन लागू झाला होता. त्याचमुळे रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं देखील पाहायला मिळालं. त्यामुळे आता मुख्यमंत्री लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत काही बोलणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज रात्री ८.३० वाजता राज्यातील जनतेला संबोधित करतील.
आमच्या फेसबुक पेजवर पहा: https://t.co/inT9S1ArT0 pic.twitter.com/JQ0ZQXdCNj
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 30, 2021
कोरोनाच्या दुसर्या लाटेत ‘इतके’ पट जास्त मृत्यू झाले
हे वाचलं का?
महाराष्ट्रातला Lockdown कायम राहणार आहे पण..: राजेश टोपे
दरम्यान, तीनच दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. ज्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संकेत दिले होते की, महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम राहिल. मात्र, तो कायम राहून त्यामध्ये काही शिथिलता देता येईल का? यावर चर्चा करण्यात आली होती. पाहा याबाबत राजेश टोपे नेमकं काय म्हणाले होते.
ADVERTISEMENT
‘जवळपास 21 जिल्ह्यांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे तिथे रूग्ण दरवाढही जास्त आहे. लॉकडाऊन लावण्यात येतो तेव्हा दोन निकष असतात एक असतो पॉझिटिव्हिटी रेट आणि दुसरा असतो बेड्सची उपलब्धता. आज घडीला जो लॉकडाऊन आहे तो कायम राहून त्यामध्ये काही शिथिलता देता येईल का? यावर चर्चा झाली. ही शिथिलता काही तास वाढवण्याची आहे का? अधिक जास्त दुकानं उघडण्याची आहे का? इतकी बारकाईने चर्चा कॅबिनेटमध्ये झाली नाही. शिथिलता काही प्रमाणात दिली जाईल. पण लॉकडाऊन कायम राहणार आहे.’ असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं होतं.
ADVERTISEMENT
कोणत्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल होणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम?
‘कोरोना व्हायरसमध्ये नवा व्हेरिएंटही आढळला आहे. तो मुद्दाही विचारात घेतला आहे. सरासरीपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या जिल्हे. याबाबत चर्चा झाली. आहे तो लॉकडाऊन वाढणार आहे जी शिथीलता आहे त्याबाबतचे बारकावे काय असतील याबाबत मुख्यमंत्री टास्क फोर्सशी चर्चा करून निर्णय घेतील. जे निर्बंध कमी करायचे आहेत त्याबाबत मुख्यमंत्री, टास्क फोर्स आणि आरोग्य विभाग चर्चा करून निर्णय घेईल. येत्या दोन दिवसांमध्ये त्यावर निर्णय होईल.’ असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT