विरोधकांचं काम जनतेला भरकटवणं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच अॅक्शन मोडमध्ये -आदित्य ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती एकदम ठणठणीत आहे. ते लवकरच अॅक्शन मोडमध्ये दिसतील. विरोधक काय म्हणतात त्याकडे लक्ष देऊ नका. आरोप करणं, जनतेला भरकटवणं हेच त्यांचं काम आहे त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे. शिवसेना […]
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती एकदम ठणठणीत आहे. ते लवकरच अॅक्शन मोडमध्ये दिसतील. विरोधक काय म्हणतात त्याकडे लक्ष देऊ नका. आरोप करणं, जनतेला भरकटवणं हेच त्यांचं काम आहे त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे.
ADVERTISEMENT
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानं आदित्य ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. विरोधी पक्षाने म्हणजेच भाजपने आत्तापर्यंत अनेकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. एवढंच काय मुख्यमंत्र्यांनी कार्यभार रश्मी ठाकरे किंवा आदित्य ठाकरेंकडे सोपवावा असंही वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. याबाबत आज आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारला गेला त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती उत्तम असून लवकरच ते अॅक्शन मोडमध्ये दिसतील असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना काय निरोप दिला?
हे वाचलं का?
इंडिया टुडेच्या सर्व्हेचा आदित्य ठाकरेंकडून उल्लेख
इंडिया टुडेने जो मूड ऑफ द नेशन हा सर्व्हे केला त्याचाही उल्लेख आदित्य ठाकरे यांनी केला. इंडिया टुडेच्या सर्व्हेचा दाखला देत आदित्य ठाकरे म्हणाले की तुम्ही तो सर्व्हे पाहिला असेल तर लक्षात येईल की त्यातही मुख्यमंत्री पहिल्या पाचात आहेत. विरोधी पक्ष काय बोलतो, त्यांच्याकडे लक्ष न देणंच बरं. कारण ते आरोप प्रत्यारोप करतच असतात. जनता जनार्दन मुख्यमंत्र्यांसोबत आणि आमच्यासोबत ठामपणे उभे आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
Mood Of The Nation : देशात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती? वाचा इंडिया टुडेचा सर्व्हे
ADVERTISEMENT
आणखी काय म्हणाले आदित्य ठाकरे?
राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत. परंतु, शाळा सुरू होत असल्या तरी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार ज्यांना योग्य वाटतं त्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे. ज्यांना वाटते रिस्क घेऊ नये त्यांनी घेऊ नये. उद्यापासून शाळा सुरू होत असल्या तरी पुढची पावलं कशी टाकयची हे शाळा आणि पालकांनी ठरवायचे आहे, असे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
कोरोना महामारीच्या काळात तब्बल सातशे दिवस शाळा बंद होत्या. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका कमी झाला आहे अशा जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT