लोकांना रस्त्यावर उतरवून कोरोना घरोघरी पोहचवणं हे नेतृत्वाचं लक्षण नाही – मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ओबीसी आरक्षणावरुन शनिवारी राज्यात भाजपने विविध शहरांमध्ये चक्काजाम आंदोलन केलं. मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती अशा अनेक महत्वाच्या शहरांमध्ये हे आंदोलन पार पडलं, ज्यामुळे अनेक भागांत वाहतुक कोडींही पहायला मिळाली. दरम्यान भाजपच्या या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे. लोकांना रस्त्यावर उतरवून कोरोना घरोघरी पोहचवणं हे नेतृत्वाचं लक्षण नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

सारथी केंद्राच्या कोल्हापूर उप-केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन करत असताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला. “संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी साधायचा हे ज्याला कळलं तोच खरा नेता असतो. नुसती आदळआपटण करायची याला नेतृत्व म्हणता येणार नाही. समोरुन मिळते आहे तरी आदळआपट कर आणि मोडून टाक हे नेतृत्वाचं लक्षण नाही. सरकार तुमच्या मागण्या ऐकत आहे मग संघर्ष कशासाठी? सरकार मागण्या ऐकत नसतं तर मीच तुमच्यासोबत रस्त्यावर उतरलो असतो.”

ज्याप्रमाणे मराठा समाजही माझा त्याच पद्धतीने ओबीसी समाजही माझाच आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात शाहू महाराजांनी दीनदुबळ्यांना एकत्र करुन त्यांना ताकद दिली तिच परंपरा हे सरकार पुढे चालवत आहे. आरक्षणाचा अधिकार हा आता राज्याला नाही, केंद्राला आहे किंवा राष्ट्रपतींना आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. त्यामुळे आम्ही मोदींना विनंती केली आहे की लवकरात लवकर आपल्या अधिकारात निर्णय घ्या आणि समाजाला न्याय द्या असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT