Lockdown: कोरोना रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन हा एकमेव उपाय: राहुल गांधी
नवी दिल्ली: भारतातील (India) कोरोना संसर्ग (Corona Infection) हा सातत्याने वाढत असून हे संकट दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा भारत सरकारला सल्ला दिला आहे की, कोरोनाची ही लाट रोखण्याचा एकमेवर उपाय म्हणजे संपूर्ण लॉकडाऊन. राहुल गांधी यांनी आज (4 मे) याबाबतचं […]
ADVERTISEMENT
नवी दिल्ली: भारतातील (India) कोरोना संसर्ग (Corona Infection) हा सातत्याने वाढत असून हे संकट दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा भारत सरकारला सल्ला दिला आहे की, कोरोनाची ही लाट रोखण्याचा एकमेवर उपाय म्हणजे संपूर्ण लॉकडाऊन. राहुल गांधी यांनी आज (4 मे) याबाबतचं ट्विट केलं आहे.
ADVERTISEMENT
राहुल गांधी यांनी याबाबत ट्विट करताना असं म्हटलं आहे की, ‘भारत सरकारला ही गोष्ट समजत नाही की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाउन हा एकमेव मार्ग आहे. परंतु समाजातील काही घटकांना न्याय योजनेचा लाभ देऊन. पण भारत सरकारच्या निष्क्रियतेमुळे अनेक निरपराध लोकांचा बळी जात आहे.’
GOI doesn’t get it.
The only way to stop the spread of Corona now is a full lockdown- with the protection of NYAY for the vulnerable sections.
GOI’s inaction is killing many innocent people.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 4, 2021
खरं तर आतापर्यंत राहुल गांधी हे लॉकडाऊनविरोधात आपलं मत व्यक्त करत होते. गेल्या वर्षीही जेव्हा भारत सरकारने पूर्ण लॉकडाउन लागू केलं होतं तेव्हा राहुल गांधी यांनी त्यावर टीका केली होती. राहुल गांधी अनेक वेळा म्हणाले होते की, ‘लॉकडाउन हे केवळ कोरोनाची गती थांबवतं, ते त्याला संपवत नाही.’ दरम्यान, आता स्वत: राहुल गांधी असं म्हणत आहेत की, कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊनची गरज आहे.
हे वाचलं का?
‘महाराष्ट्र सोडून देशभरात लॉकडाऊन करा असं फडणवीस मोदींना सांगतील का?’
तसं पाहिल्यास महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये आता तेथील राज्य सरकारांनी लॉकडाऊन लागू केलं आहे. पण असं असलं तरी केंद्रीय स्तरावर याबाबत काहीही निर्णय झालेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी अद्यापही बऱ्याच गोष्टी खुलेआम सुरु आहेत ज्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक होण्याची भीती वर्तवली जात आहे.
ADVERTISEMENT
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार
ADVERTISEMENT
सध्या संपूर्ण देश हा कोरोनाच्या दुसर्या लाटेचा सामना करत आहे. ही लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक भयंकर आहे. मागील दोन आठवड्यांपासून देशात दररोज तीन लाखाहूनही जास्त नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. मध्यंतरी हा आकडा जवळजवळ 4 लाखांच्या वर देखील पोहचला होता.
याशिवाय देशात दररोज कोरोनाच साडेतीन हजारांहून अधिक रुग्ण दगावत असल्याची नोंद होत आहे. भारतात आतापर्यंत 2 कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यापैकी आतापर्यंत 2,22,408 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या संपूर्ण देशात तब्बल 34 लाखांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबईत लॉकडाऊन वाढणार का?, पाहा काय आहे मुंबई महापालिका आयुक्तांचं उत्तर!
देशातील अनेक राज्यांनी त्यांच्या पातळीवर यापूर्वीच अनेक निर्बंध लादले आहेत. महाराष्ट्रात मागील 15 दिवसांपासूनच कडक लॉकडाऊन सुरु आहे. तर हरियाणामध्ये देखील संपूर्ण लॉकडाउन आहे. याशिवाय दिल्ली, ओडिशा, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये देखील अनेक दिवसांपासून कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत.
या व्यतिरिक्त अनेक राज्ये शनिवार व रविवार लॉकडाउन, नाइट कर्फ्यूद्वारे हे संक्रमण थांबविण्याचा प्रयत्न करीत आहेत. (complete lockdown is the only way to stop the spread of corona rahul gandhi tweet)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT