Shinde-Awhad : ठाण्यात संघर्ष पेटला! “आव्हाडांचा शेवट जवळ आला आहे”
NCP Leader Jitendra Awad : ठाणे : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्र्याचे आमदार जितेंद आव्हाड (Mumbra NCP MLA Jitendra Awad ) आणि (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद काही कमी होताना दिसत नाही. कळवा येथील रोडवर जितेंद्र आव्हाडांचा फोटो आसलेल्या बोर्डाची तोडफोड केल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ही तोडफोड महापालिकेचे […]
ADVERTISEMENT
NCP Leader Jitendra Awad : ठाणे : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्र्याचे आमदार जितेंद आव्हाड (Mumbra NCP MLA Jitendra Awad ) आणि (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद काही कमी होताना दिसत नाही. कळवा येथील रोडवर जितेंद्र आव्हाडांचा फोटो आसलेल्या बोर्डाची तोडफोड केल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ही तोडफोड महापालिकेचे अधिकारी मनिष जोशी यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांनी केली, असं जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं आहे. NCP Leader Jitendra Awhad Vs CM Eknath Shinde
ADVERTISEMENT
Jitendra Awhad: “CM एकनाथ शिंदे म्हणतील तुला माहित आहे ना? मी हे करू शकत नाही”
जितेद्र आव्हाडांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत रस्त्यावर एक एलईडी बोर्ड आहे, ज्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांचा फोटो आणि खाली डॉ. जितेद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून असं लिहलेलं आहे. मात्र दुसऱ्या फोटोत आव्हाडांचा फोटो असलेली एलईडी बंद असल्याचं दिसून येत आहे.
हे वाचलं का?
आव्हाडांनी काय लिहलंय ट्विटमध्ये
”किती हे सुडाचे राजकारण? कळव्याच्या पूर्वेला मी जी आमदार निधीतून कामे केली आहेत त्या कामांचा उल्लेख असलेला LED बोर्ड आमदार निधीतून लावण्यात आला होता. आज सकाळी अचानक 8 वाजता महापालिकेचे अधिकारी मनिष जोशी यांच्या नेतृत्वाखाली त्या बोर्डची मोडतोड करून तो बोर्ड काढण्यात आला. मी मनिष जोशी यांना फोन केला असता, त्यांचे उत्तर साध्या आणि सोप्या शब्दात होते की, काय करणार साहेब कोणाचा फोन आल्यावर नाही म्हणू शकतो का मी? याचा अर्थ फोन कोणाचा आला असेल ते मला समजलं”, असं आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये लिहलं आहे.
किती हे सुडाचे राजकारण… कळव्याच्या पूर्वेला मी जी आमदार निधीतून कामे केली आहेत त्या कामांचा उल्लेख असलेला LED Board आमदार निधी तून लावण्यात आला होता. आज सकाळी अचानक 8 वाजता महापालिकेचे अधिकारी मनिष जोशी यांच्या नेतृत्वाखाली त्या बोर्डची मोडतोड करून तो बोर्ड काढण्यात आला. pic.twitter.com/Ibq00BUYEq
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 13, 2023
ADVERTISEMENT
“आव्हाडांचा शेवट जवळ आला आहे”- नरेश म्हस्के
यावरुन ठाण्यात शिंदे पिता पुत्र जितेंद्र आव्हाडांच्याविरोधात कमालीचे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. मुंब्रा येथे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आव्हाडांवर टीका केली आहे. आव्हाड यांच्या शेवटाला सुरुवात झाली असल्याची नरेश म्हस्के यांनी मुंब्रा येथील सभेत बोलताना केलीय.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरेंवर ठाण्यातील शिवसैनिक नाराज? कारण ठरले जितेंद्र आव्हाड!
श्रीकांत शिंदेंचं आव्हाडांना मुंब्र्यातून आव्हान
तर दुसरीकडे खासदार श्रीकांत शिंदे आव्हाडांना त्यांच्याच मुंब्रा-कळवा भागात आव्हान देताना पाहायला मिळत आहे. सोमवारी श्रीकांत शिंदे यांनी कळवा मुंब्र्यात जोरदार शक्ती प्रदशन केलं.यासह त्यांनी मुंब्र्यातील विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरु केला आहे. तब्बल 22 कोटींच्या खासदार निधीतून होणाऱ्या कामांच्या उद्घाटनसाठी मुंब्रा येथे आलेल्या खासदार शिंदे यांच्या स्वागताला प्रचंड गर्दी जमा झाली होती. श्रीकांत शिंदे यांनीही बोलतांना जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका केली. सगळं मी केलं मी केलं म्हणतात. नगरसेवकांना काही तरी कामं सोड. सर्वच श्रेय लाटण्याची सवय लागल्याने नगरसेवक तुम्हाला सोडून चालले आहेत, अशी टीका श्रीकांत शिंदेंनी आव्हाडांवर केली.
आव्हाडांचं प्रत्यूत्तर
नरेश म्हस्केंच्या आव्हाडांचा शेवट जवळ आला आहे या वक्तव्यावर आव्हाडांनी पुन्हा दुसरा ट्विट लिहिला आहे. ”आव्हाडांचा अंत करू. आव्हाडांचा शेवट जवळ आला आहे. गद्दार सेनेचे प्रवक्ते….देव त्यांना सदबुद्धी देवो. ओम शांती शांती..!” असं ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. आता शिंदे आणि आव्हाड यांच्यातील संघर्ष कुठे जाऊन थांबतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
आव्हाडांचा अंत करू…..
आव्हाडांचा शेवट जवळ आला आहे ..
गद्दार सेनेचे प्रवक्ते ….देव त्यांना सदबुद्धी देवो ….
ओम शांती शांती..!
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 13, 2023
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT