नागपूरमध्ये नितीन गडकरींच्या घरासमोर राडा! भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने
योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरासमोर काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते समोरासोमर आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यांना उत्तर देण्यासाठी भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र झाले. काँग्रेसचे कार्यक्रतेही नियोजित वेळेत पोहचले. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही अंतरावर बॅरिकेटिंग करून थांबवले. भाजपचे पदाधिकारी काँग्रेसवाल्याच्या दिशेने धावत सुटले असतानाही पोलिसांनी मात्र समयसूचकता दाखवत […]
ADVERTISEMENT
योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
ADVERTISEMENT
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरासमोर काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते समोरासोमर आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यांना उत्तर देण्यासाठी भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र झाले. काँग्रेसचे कार्यक्रतेही नियोजित वेळेत पोहचले. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही अंतरावर बॅरिकेटिंग करून थांबवले. भाजपचे पदाधिकारी काँग्रेसवाल्याच्या दिशेने धावत सुटले असतानाही पोलिसांनी मात्र समयसूचकता दाखवत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना रोखून धरले. त्यामुळे पोलिसांनी आमने-सामने येऊन वाद होण्याची परिस्थिती असतांना मोठा पोलिस बंदोबस्तासह सांभाळण्यात यश आले.
हे वाचलं का?
काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला आणि नियोजित वेळेत गडकरी यांच्या घरासमोर पोहचले. अखेर काही वेळ घोषणाबाजी केल्यानंतर पोलिसांनी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आणि आमदार विकास ठाकरे तसेच आमदार अभिजित वंजारी यांना ताब्यात घेऊन आंदोलनकर्त्यांनी कुठलाही वाद निर्माण होण्यापूर्वी हटवण्यात यश आले. पण भाजपचे कार्यक्रते मात्र अजूनही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर मोठ्या संख्यने गर्दी करून थांबले असून अजूनही जय श्री राम! तसेच काँग्रेस मुर्दाबादचे नारे लावता आहे.
काय आहे प्रकरण?
ADVERTISEMENT
देशात कोरोना पसरवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार आहे असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केलं होतं. त्याविरोधात काँग्रेसनं राज्यभर आंदोलन केलं होतं. आज नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी नितीन गडकरींच्या घरासमोर आंदोलन केलं. मोदी सरकार मुर्दाबादच्या घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. तसंच महाराष्ट्राचा अपमान सहन केला जाणार नाही, मोदींनी देशाची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली.
ADVERTISEMENT
कोरोना प्रादुर्भावासाठी महाराष्ट्र जबाबदार असल्याचं वक्तव्य करणाऱ्या पंतप्रधान मोदींविरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यावरून भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा आमनेसामने आले. आज नागपुरात काँग्रेस कार्यकर्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात आंदोलनासाठी त्यांच्या निवासस्थानासमोर आले. मात्र आधीपासूनच तिथे भाजप कार्यकर्त्यांची गर्दी होती त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूला काँग्रेस तर दुसऱ्या बाजूला भाजपचे कार्यकर्ते असं चित्र दिसून आलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT