“Sharad Pawar यांचा लपून-छपून राजकारण करण्याचा स्वभाव नाही!”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Congress leader and former Chief Minister Ashok Chavan has criticized Devendra Fadnavis :

ADVERTISEMENT

मुंबई : ‘पहाटेच्या शपथविधीला’ राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची संमती होती, असा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. ते ‘टीव्ही 9 मराठी’ वृत्तवाहिनीवर ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या कार्यक्रमात बोलत होते. फडणवीस यांच्या या गौप्यस्फोटानंतर महाराष्ट्रातील पहाटेचा शपथविधी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तसंच राजकारणालाही सुरुवात झाली आहे. (Devendra Fadnavis NCP President Sharad Pawar consented to the ‘morning swearing-in’ in November 2019)

यावर खुद्द शरद पवारांनी तात्काळ प्रत्युत्तर दिलं आहे. “देवेंद्र फडणवीस हा सुसंस्कृत माणूस आहे, सभ्य माणूस आहे तरीही असत्याचा आधार घेत असं बोलतील मला कधी वाटलं नाही. कशाच्या आधारावर ते बोलले मला माहीत नाही.’ असं म्हणतत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांनी केलेला दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे”

हे वाचलं का?

Devendra Fadnavis यांनी डाव फिरवला; ‘तो’ शपथविधी शरद पवार यांच्याच संमतीने!

शरद पवारांच्या मदतीला माजी मुख्यमंत्री धावले :

फडणवीस यांनी शरद पवार यांच्याकडे बोट दाखविल्यानंतर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्यांना हा साक्षात्कार आताच निवडणुकीच्या तोंडावर कसा होतो हा एक प्रश्न आम्हा सर्वांसमोर आहे? पवार साहेब खूप ज्येष्ठ नेते आहेत, ते खूप मुरब्बी नेते आहेत, पवार साहेब असं कधीही करणार नाहीत. त्यांनी आजवरच्या कारकीर्दत खुलेआम भूमिका घेतल्या आहेत. लपून छपून राजकारण करण्याचा त्यांचा स्वभाव नाही, असही चव्हाण म्हणाले.

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझ्यासोबत विश्वासघात दोनवेळा झाला. पहिला उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांनी आधी आमच्यासोबत निवडणुका लढविल्या, आमच्यासोबत निवडून आले. निवडणुकीच्या कार्यक्रमात मोदीजी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असे म्हणतं होते तेव्हा तेही टाळ्या वाजवत होते. पण ज्यावेळी आकडे लक्षात आले त्यावेळी त्यांनी माझा फोनही घेतला नाही. माझ्याशी चर्चाही केली नाही. मुख्यमंत्रीपदाची खूर्ची त्यांना इतकी प्रिय झाली की ते राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत निघून गेले. त्यामुळे एकप्रकारे त्यांनी विश्वासघात केला.

ADVERTISEMENT

Sharad Pawar: ‘फडणवीस सभ्य माणूस पण..’ पहाटेच्या शपथविधीवरुन पवारांनी सुनावलं

पुढे बोलताना फडणवीस यांनी सकाळच्या शपथविधीवर भाष्य केलं. ते म्हणाले, दुसरा विश्वासघात आमच्यासोबत केला त्यांना मी कमी दोष देईन. कारण त्यांनी आमच्यासोबत निवडणूक लढवली नव्हती. ज्यावेळी उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत चर्चा करत होते, त्यांची चर्चा पुढे जात होती. पण त्यावेळी आम्हाला राष्ट्रवादीकडून ऑफर आली की आम्हाला स्थिर सरकार हवं आहे, आपण सरकार तयार करुया.

राजकारणात एखादी व्यक्ती तुम्हाला धोका देते त्यावेळी तुम्हाला चेहरा पाहत बसता येत नाही. त्यामुळे आम्ही निश्चय केला आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी शरद पवार यांच्यासोबतच चर्चा झाली होती. ती काही खाली चर्चा झाली नव्हती. शरद पवार यांशी चर्चा झाल्यानंतर गोष्टी ठरल्या. पण त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे त्याही ठिकाणी एकप्रकारचा विश्वासघात झाला. पण पहिला विश्वासघात जास्त मोठा होता. कारण आपल्याच व्यक्तीने केला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT