PM Modi Lok Sabha speech: लोकसभेत राहुल गांधींचे 9 हल्ले, PM मोदींचे पलटवार
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील (PM Modi Lok Sabha speech) चर्चेला उत्तर दिले. यावेळी पीएम मोदी पूर्ण जोशात दिसले. सरकारची बाजू मांडतांना त्यांनी काँग्रेसवरही जोरदार हल्ला चढवला. पीएम मोदींनी काव्यात्मक शैलीत काँग्रेसवर निशाणा साधला आणि त्याचवेळी पंडित नेहरूंचे कोट्स वापरून त्यांनी विरोधकांच्या हल्ल्यांनाही प्रत्युत्तर दिले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष […]
ADVERTISEMENT
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील (PM Modi Lok Sabha speech) चर्चेला उत्तर दिले. यावेळी पीएम मोदी पूर्ण जोशात दिसले. सरकारची बाजू मांडतांना त्यांनी काँग्रेसवरही जोरदार हल्ला चढवला. पीएम मोदींनी काव्यात्मक शैलीत काँग्रेसवर निशाणा साधला आणि त्याचवेळी पंडित नेहरूंचे कोट्स वापरून त्यांनी विरोधकांच्या हल्ल्यांनाही प्रत्युत्तर दिले.
ADVERTISEMENT
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेत बोलताना सरकारवर प्रचंड हल्ला चढवला होता. त्यांच्या प्रत्येक हल्ल्याला पंतप्रधान मोदींनीही प्रत्युत्तर दिलं आहे. गरिबीच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांनी काँग्रेसला घेरले आणि प्रत्येक प्रश्नाला निवडक उत्तरे दिली.
काँग्रेसवर हल्लाबोल करताना पंतप्रधान म्हणाले की, गरीबी हटाओ नारा देऊन 1971 पासून निवडणूक लढवत होतो, पण गरिबी हटलेली नाही. त्यांनी गरिबीची व्याख्या बदलून 17 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणले.
हे वाचलं का?
राहुल गांधींचा हल्लाबोल, पीएम मोदींचा पलटवार
1. राहुल गांधी- दोन हिंदुस्थान झाले आहेत. एक गरीब आणि एक श्रीमंतांचा भारत. दोघांमधील दरी वाढत आहे.
ADVERTISEMENT
पीएम मोदी- कोरोनाच्या काळातही एकही गरीबांचा उपासमारीने मृत्यू झाला नाही. आम्ही अजूनही 80 कोटी लोकांना मोफत रेशन देत आहोत. आज घरांसाठी पैसा आला की गरीब लखपती होत आहेत. कल्याणकारी योजनांचा लाभ थेट गरीबांपर्यंत पोहोचत आहे.
ADVERTISEMENT
2. राहुल गांधी- 84 टक्के लोकांचे उत्पन्न घटले आहे. त्यांची वेगाने गरीबीकडे वाटचाल सुरू आहे. यूपीए सरकारने 10 वर्षांत 27 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आणि तुम्ही 23 कोटी लोकांना पुन्हा गरीबीच्या खाईत लोटले.
पीएम मोदी- काँग्रेस ‘गरीब हटाओ’ याच घोषणाबाजीवर 1971 पासून निवडणूक लढवत आहे. पण गरीबी काही हटली नाही. यूपीए सरकारने गरीबीची व्याख्याच बदलली. दारिद्र्यरेषेची व्याख्या बदलून 17 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणून उभे केले. गरीबांना तुम्ही काय आहात ते समजलं म्हणूनच त्यांनी तुम्हाला 44 जागांवर आणलं.
3. राहुल गांधी- भारताच्या अर्थव्यवस्थेत डबल ‘A’ व्हेरिएंट पसरत आहे. अंबानी आणि अदानी. सर्व पैसे या लोकांच्या हातातच आहेत.
पीएम मोदी- काँग्रेसच्या सत्तेच्या वेळी त्यांचे मित्रपक्षही 60 आणि 80 च्या दशकात टाटा-बिर्ला यांचे सरकार म्हणायचे. आजही ते तेच करत आहेत. काँग्रेसमध्ये असे लोक बसले आहेत जे म्हणतात की हे उद्यमशील लोक कोरोना विषाणूचे व्हेरिएंट आहेत. जे इतिहासातून शिकत नाहीत ते इतिहासात हरवून जातात. तुमच्या सवयी बदलल्या नाहीत.
4. राहुल गांधी- भारतातील तरुण रोजगाराच्या शोधात आहेत. गेल्या वर्ष 2021 मध्ये तीन कोटी तरुणांनी रोजगार गमावला आहे. 50 वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारी आज भारतात आहे.
पीएम मोदी- आम्ही अनेक प्रलंबित प्रकल्प पूर्ण केले आहेत. परदेशी गुंतवणूक येत आहे. प्रत्येक क्षेत्रात उत्पादन वाढत आहे. अर्थव्यवस्था जितकी विकसित होईल तितक्या रोजगाराच्या संधी वाढतील. 2014 पूर्वी 500 स्टार्टअप होते. आज देशात 60 हजारांहून अधिक स्टार्टअप्स आहेत. पूर्वी कंपन्यांना हजार कोटींपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक वर्षे लागायची. आज आपले अनेक तरुण एक-दोन वर्षात युनिकॉन झाले आहेत.
5. राहुल गांधी- गेल्या सात वर्षांत एकामागून एक लघु आणि मध्यम उद्योगांवर हल्ले होत आहेत. असंघटित क्षेत्रावर हल्ले होत आहेत. कोरोनाच्या वेळी त्यांना जो पाठिंबा द्यायचा होता तो तुम्ही दिला नाही. तुम्ही असंघटित क्षेत्र उद्ध्वस्त केले आहे. लघु आणि मध्यम उद्योग संपुष्टात आले.
पंतप्रधान मोदी- कोरोनाच्या काळात लघु उद्योगांना सुरक्षित करण्यासाठी तीन लाख कोटींची विशेष योजना सुरू केली. यामुळे 13.5 कोटी एमएसएमई उद्ध्वस्त होण्यापासून वाचले. लाखो नोकऱ्याही वाचल्या. असे एफबीआयच्या अभ्यासात म्हटले आहे. रस्त्यावरील विक्रेत्यांना स्वनिधी योजनेचा लाभ मिळत आहे. मुद्रा योजनेंतर्गत कोणत्याही हमीशिवाय बँकेकडून कर्ज घेऊन लोक स्वयंरोजगार करतात.
6. राहुल गांधी- आज तुम्ही ‘मेड इन इंडिया’बद्दल बोलत राहता. पण हे असंच होणार नाही, त्यासाठी लघु व मध्यम उद्योगाला पुढे जावे लागेल. गेल्या पाच वर्षांत उत्पादन क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये 46 टक्क्यांनी घट झाली आहे.
पीएम मोदी- हे लोक म्हणायचे की ‘मेड इन इंडिया’ होऊ शकत नाही. ‘मेक इन इंडियाची’ खिल्ली उडवली गेली. पण आज देशातील युवा शक्तीने हे करुन दाखवलं आहे आणि तुमची चेष्टा झाली आहे. मेक इन इंडियाच्या यशामुळे तुम्हाला किती वेदना होत आहेत हे मला समजले आहे.
भारताच्या अर्थव्यवस्थेत ‘डबल A व्हेरिएंट’ पसरतोय; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7. राहुल गांधी- भारताची व्याख्या राज्यघटनेत राष्ट्र म्हणून नव्हे, तर राज्यांचे संघटन म्हणून करण्यात आली आहे. युनियन ऑफ स्टेटची एक कल्पना आहे जिथे अभिसरण आणि वाटाघाटी शासन करू शकतात. दुसरी दृष्टी केंद्रीयकरणाची, कठोर शासनाची आहे.
पीएम मोदी- संविधानात राष्ट्र हा शब्द येत नाही असे सांगून या सदनाचा अपमान करण्यात आला. राष्ट्र ही सत्ता किंवा सरकारची व्यवस्था नाही. आमच्यासाठी राष्ट्र हा जिवंत आत्मा आहे. पीएम मोदींनी पंडित नेहरूंनी वापरलेलं एक वाक्यही यावेळी सांगितलं.
8. राहुल गांधी- कोरोनाच्या काळात शेतकरी वर्षभर बाहेर बसले पण राजा याच्याशी सहमत नाही. तुम्ही कोणाचेही ऐकत नाही.
पीएम मोदी- जे मुळापासून तुटलेले आहेत, दोन-चार पिढ्यांपासून वाड्यांमध्ये राहत आहेत, त्यांना छोट्या शेतकऱ्यांचे प्रश्न समजू शकलेले नाहीत. जगामध्ये पुरवठा साखळी प्रभावित झाल्यामुळे खत संकटाची परिस्थिती आहे. परंतु भारतात त्याचा पुरवठा सुरूच आहे. लहान शेतकरी मजबूत असेल तर ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल. 21व्या शतकातील आकांक्षा 19व्या शतकातील कायद्याने पूर्ण होऊ शकत नाहीत.
‘आज तर फक्त नेहरूजी, नेहरूजी.. बस मजा घ्या’, पंतप्रधान मोदी भाषणादरम्यान असं का म्हणाले?
9. राहुल गांधी- तुम्ही जे करत आहात ते अत्यंत धोकादायक आहे. पूर्वोत्तर, तामिळनाडू आणि जम्मू-काश्मीरमध्ये समस्या सुरू झाल्या आहेत. तुम्ही युनियन ऑफ स्टेटमधील प्रत्येकाचा आदर केला पाहिजे.
पीएम मोदी- काँग्रेस ‘फोडा आणि राज्य करा’ हा वारसा पुढे नेत आहे. तामिळ भावना पेटवण्याचा प्रयत्न झाला. काँग्रेस तुकडे तुकडे टोळीचा नेता झाला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT