काँग्रेसचा माणूस शिंदेंनी पळवला, टेन्शन रोहीत पवारांचं का वाढलं?
अहमदनगर जिल्हाच्या राजकारणात रोहित पवार आमदार असलेले कर्जत जामखेडचा मतदारसंघ हा हाय व्होल्टेज मतदारसंघ मानला जातो. २०१९ ला या मतदारसंघात राम शिंदे या मंत्र्यांचा पराभव करत रोहित पवार पहिल्यांदाच आमदार झाले आणि पवार घराण्यातल्या व्यक्तीचा नगरच्या राजकारणात प्रवेश झाला. त्यानंतर आता पराभूत उमेदवार राम शिंदे हे काही काळ तालुक्याच्या राजकाराणातून लांब गेले. पण विधान परिषदेत […]
ADVERTISEMENT
अहमदनगर जिल्हाच्या राजकारणात रोहित पवार आमदार असलेले कर्जत जामखेडचा मतदारसंघ हा हाय व्होल्टेज मतदारसंघ मानला जातो. २०१९ ला या मतदारसंघात राम शिंदे या मंत्र्यांचा पराभव करत रोहित पवार पहिल्यांदाच आमदार झाले आणि पवार घराण्यातल्या व्यक्तीचा नगरच्या राजकारणात प्रवेश झाला. त्यानंतर आता पराभूत उमेदवार राम शिंदे हे काही काळ तालुक्याच्या राजकाराणातून लांब गेले. पण विधान परिषदेत राम शिंदेंचे पुन्हा पुनर्वसन करण्यात आलं आणि तेव्हापासून राम शिंदे हे तालुक्याच्या राजकारणात आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे.
ADVERTISEMENT
झालंय असं नगरचे काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष प्रवीण घुले यांनी राम शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे. प्रवीण घुले हे जरी काँग्रेसचे नेते असले तरी त्यांनी २०१९ ला रोहीत पवारांनी मदत केली होती. त्याचा फायदाही पवारांना झाला होता.
सध्या भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. राम शिंदे जास्तीत जास्त वेळ मतदारसंघात घालवत आहे. काही दिवसांपूर्वीच २०० कार्यकर्त्यांनी कर्जत जामखेडमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. रोहित पवारांनी २०१९ ला नियोजनबध्दरितीने राम शिंदेंची माणसं फोडून त्यांना राष्ट्रवादीमध्ये आणलं होत. त्याचीच परतफेड आता राम शिंदे प्रवीण घुलेंच्या रुपाने करताना दिसत आहेत.
हे वाचलं का?
राम शिंदे हे धनगर समाजातले नेते असून राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे मानले जातात. विधानपरिषदेवर गेल्यामुळे कर्जत जामखेडमधून भाजप नवीन उमेदवाराच्या शोधात आहे. प्रवीण घुले जर भाजपात आले तर त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते.प्रवीण घुले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला त्यांत त्यांनी विकासासाठी सत्तेसोबतच्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तसेच रोहीत पवारांच्या एकूणात कार्यपद्धतीवर त्यांनी नाराजी व्य़क्त केली.
राज्यात झालेला सत्ताबदल आणि राम शिंदेंना देण्यात आलेली आमदारकी यामुळे कार्यकत्यांचे इनकमिंग जोरात सुरु आहे.त्यामुळे प्रवीण घुले यांनी आगामी काळात भाजपात प्रवेश केला तर तो रोहीत पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT