कोल्हापूरचे Congress आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन झालं आहे. गुरुवारी हैदराबादमध्ये उपचादारम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबादमध्ये उपचार सुरु होते. काल रात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांचं निधन झाल्याचं कळतंय.

ADVERTISEMENT

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात काँग्रेस पक्षाकडून उद्योजक चंद्रकांत जाधव यांची थेट लढत झाली होती यामध्ये चंद्रकांत जाधव विजयी झाले होते.. जाधव हे स्वतः उद्योजक व्यवसायिक असल्यामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क त्या बळावर त्यांनी हा विजयी खेचून आणला होता.

हे वाचलं का?

आमदार उद्योजक चंद्रकांत जाधव यांना मागील दीड वर्षात दोन वेळा कोरोना ची लागण झाली होती त्यातून ते बरे झाले होते, मात्र काही दिवसांपूर्वी त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आमदार जाधव यांना पोटात इन्फेक्शन झाले होते. हैदराबाद मधील रुग्णालयात त्यांच्यावर सोमवारी मोठी शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रिया यशस्वी झाली, परंतु शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती उपचाराला साथ देत नव्हती अशी माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

जाधव यांचा कोल्हापुरातील अनेक तालीम मंडळ तसंच फुटबॉल खेळाडूंची मोठा थेट संपर्क होता. आमदार जाधव यांचे अचानक निधन झाल्याचे वृत्त मुळे नागरिकातून हळहळ व्यक्त होतयं कोल्हापूर मंगळवार पेठ इथं उद्योजक आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी त्यांचं पार्थिव दाखल होईल. कोल्हापूरच्या पंचगंगा स्मशानभूमीत सायंकाळी अंतिम संस्कार होईल असं निकटवर्तीयांनी सांगितले.

ADVERTISEMENT

Corona मुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईंकाना ५० हजारांचं सहाय्य, राज्य सरकारकडून वेब पोर्टल विकसीत

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT