काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनामुळे निधन
काँग्रेसचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनाने निधन झालं आहे. ते 55 वर्षांचे होते, कोरोनाचं निदान झाल्यानंतर अंतापूरकर यांच्यावर मुंबईतल्या एका रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. माझे निकटचे सहकारी व […]
ADVERTISEMENT
काँग्रेसचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनाने निधन झालं आहे. ते 55 वर्षांचे होते, कोरोनाचं निदान झाल्यानंतर अंतापूरकर यांच्यावर मुंबईतल्या एका रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
माझे निकटचे सहकारी व देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई येथे थोड्या वेळापूर्वी निधन झाले.
आ. रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबियांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना. pic.twitter.com/WxNc51ovsO— Ashok Chavan (@AshokChavanINC) April 9, 2021
देगलुरचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने राज्याच्या विधीमंडळातील अभ्यासू लोकप्रतिनिधी, मराठवाड्यातील लोकप्रिय, संघर्षशील नेतृत्वं, सर्वसामान्यांशी नाळ जोडलेला निकटचा सहकारी आज आपण गमावला आहे. त्यांच्या निधनानं देगलूर तालुका आणि महाविकास आघाडीची मोठी हानी झाली आहे. अंतापूरकर कुटुंबीय आणि देगलूरवासियांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. दिवंगत रावसाहेब अंतापूरकर साहेबांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत ट्विट केलं आहे.
कोरोना लसीकरणाबाबत राजकारण नको; अभिनेता संदीप पाठकचं सूचक ट्विट
हे वाचलं का?
आमदार रावसाहेब अंतापूरकर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचं निदान झालं होतं. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आधी त्यांना नांदेडमध्ये रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती आणखी खालावली. ज्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतल्या रूग्णालयात आणण्यात आलं. मुंबईतील रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जातो आहे. रावसाहेब अंतापूरकर हे अशोक चव्हाण यांचे निकटवर्ती होते. त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक मानले जात होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT