अनिल परब माझ्या कामात अडथळा आणत आहेत – काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांचा आरोप

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकीकडे राज्य सरकार मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. त्यातच आता महाविकास आघाडी सरकारला आपल्याच पक्षातल्या घटक पक्षाच्या नाराजी नाट्याचा सामना करावा लागतो आहे. वांद्रे पूर्व मतदार संघाचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप करत, परब माझ्या मतदारसंघात मी करत असलेल्या कामांमध्ये अडथळा आणत असल्याचं म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

लसीकरण केंद्राचं उद्घाटनं ठरलं वादाचं निमीत्त –

मुंबईतील वांद्रे पूर्व मतदार संघात समाज मंदीर येथे नवीन लसीकरण केंद्र सुरु करण्यात आलं. या लसीकरण केंद्राचं उद्घाटन कॅबिनेट मंत्री अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आलं. परंतू या मतदार संघाचे आमदार असलेल्या झिशान सिद्दीकी यांना महापालिकेने या कार्यक्रमासाठी आमंत्रणच दिलं नाही. ज्यामुळे झिशान सिद्दीकी नाराज असल्याचं बोललं जातंय. महत्वाची गोष्ट म्हणजे या उद्घाटन सोहळ्याला झिशान सिद्दीकी यांच्याविरोधात निवडणूकीत उभे राहिलेले विश्वनाथ महाडेश्वर यांनाही आमंत्रण देण्यात आलं होतं, परंतू सिद्दीकी यांना बोलावण्यात आलं नाही. ज्यामुळे सिद्दीकी नाराज आहेत.

हे वाचलं का?

परब माझ्या कामात अडथळा आणत आहेत !

दरम्यान झिशान सिद्दीकी यांनी एका व्हिडीओ मेसेजद्वारे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. “परवा माझ्या मतदार संघात एका लसीकरण केंद्राचा उद्घाटन सोहळा पार पडला. मी स्थानिक आमदार असूनही मला या कार्यक्रमाचं आमंत्रण नव्हतं. शिवसेनेचे वरिष्ठ नेते अनिल परब या कार्यक्रमाला हजर होते. विधानसभा निवडणूकीत माझे विरोधक विश्वनाथ महाडेश्वरही यावेळी हजर होते. स्थानिक नगरसेवक, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या कार्यक्रमात बोलावण्यातं आलं होतं पण मला नाही. हा नियमांचा भंग आहे. अनिल परब याआधीही असंच करत आले आहेत. मी माझ्या मतदारसंघात जी काही काम करत असेन ते त्याच्यात अडथळा आणतात. माझ्या विकासकामांना NOC मिळत नाही. महापालिकेचे अधिकारी तर मला कधीकधी उत्तरही देत नाहीत.”

ADVERTISEMENT

माझ्या मतदारसंघात मी जे काही काम करतो त्यात अनेकांचे हस्तक्षेप आणि दबाव असतो. मला आता याची सवय झाली आहे. मला काम करु द्यायचं नाही हे त्यांनी ठरवलं आहे, पण मी माझं काम करत नाही. वांद्रे पूर्वच्या जनतेला त्यांच्यासाठी चांगलं काम कोण करतंय हे माहिती आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मी वॉर्ड ऑफिस, आयुक्तांपर्यंत लेखी तक्रार केल्या परंतू त्यावर कारवाई होत नाही. अनिल परब हे ज्येष्ठ नेते आहेत मी फक्त २८ वर्षाचा तरुण आहे. अनिल परबांनी हे लक्षात घ्यावं की माझ्यामागे जनमत आहे. त्यामुळे त्यांनी मला माझं काम करु द्यावं. त्यामुळे सिद्दीकी यांनी केलेल्या आरोपांना आता शिवसेना नेते काय उत्तरं देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT