पार्टी फंडातून लसी आणल्यात का? शिवसेनेच्या पोस्टरबाजीवर काँग्रेस आमदार सिद्दीकी संतापले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजपला सत्तेतून दूर करण्यासाठी ३ पक्षांनी मिळून बनवलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल आहे असं चित्र दिसत नाहीये. मुंबईतील वांद्रे पूर्व मतदार संघात कोरोना लसीकरण केंद्राच्या उद्घाटनावरुन पोस्टरबाजी करणाऱ्या शिवसेनेला काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी खडे बोल सुनावले आहेत.

ADVERTISEMENT

झिशान सिद्दीकी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर वांद्रे पूर्व मतदार संघात लसीकरण केंद्राच्या उद्घाटनासाठी शिवसेनेने लावलेल्या पोस्टर्सचे फोटोग्राफ टाकत प्रश्न विचारला आहे. “इथे लसींपेक्षा तुम्हाला पोस्टर्सच जास्त दिसतील. या लसी शिवसेना स्वतःच्या पार्टी फंडातून आणते आहे का? कारण मला कुठेही महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख दिसत नाहीये. लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाचा गाजावाजा करणं थांबवा, ते आपलं कामच आहे”, असं म्हणत सिद्दीकी यांनी सेनेला टोला लगावला आहे.

याआधीही झिशान सिद्दीकी यांनी वांद्रे पूर्व येखील लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाला आपल्याला न बोलावल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यावेळी बोलत असताना सिद्दीकी यांनी शिवसेना नेते अनिल परब आपल्या कामात अडथळा आणत असल्याचा आरोप केला. यानंतर सिद्दीकी यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील महत्वाचा पक्ष असलेल्या शिवसेनेला आव्हान देण्याचं काम केलं आहे. सिद्दीकी यांच्या आरोपाला शिवसेना नेतृत्व काय उत्तर देतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT