कोरोना, काळजी आणि लसीकरण तुमच्या मनातल्या प्रश्नांना डॉ. रवि गोडसेंनी दिली आहेत उत्तरं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पहिल्या लाटेमध्ये असणारा कोव्हिड आणि आता आलेल्या दुसऱ्या लाटेमधला कोव्हिड याच्यामध्ये फरक आहे का असा अनेकांच्या मनात प्रश्न असतो. पण आपण जरं पाहिलं तर यामध्ये काही लक्षणं बदलली आहेत. पहिल्यांदा वास न येणं, चव न घेणं हे जास्त पहायला मिळत होतं. यावेळी मळमळ किंवा उलटीसारखं होणं ही लक्षणं अधिक दिसल्याचं म्हटलं जातंय. मात्र याला अजूनही वैज्ञानिक पुरावा नाही. मुळात आपल्याला कोव्हिड झाला असेल तर आपल्याला समजतं. दुसरी गोष्ट म्हणजे टेस्टद्वारे आपल्याला समजंत की कोरोनाची लागण झाली आहे. सध्या यावरून सगळीकडे कल्लोळ माजलाय. यामध्ये म्युटेशन तसंच डबल म्युटेशन असं म्हटलं जातंय. मात्र याचा जास्त विचार करायचा नाही. हा कोव्हिड पहिल्यासारखाच आहे.

ADVERTISEMENT

मी अनेक डॉक्टरांना प्रश्न विचारतोय मात्र त्याचं उत्तर मिळत नाहीये. दुसऱ्या लाटेत जे रूग्ण रूग्णालयात दाखल होतायत त्यापैकी किती रूग्ण आरटीपीसीआर पॉझिटीव्ह होते. त्याचं उत्तर जर शून्य असेल तर पँडमिक कधी संपेल याची तारिख मी सांगू शकतो. मात्र त्यासाठी डेटा मिळणं फार गरजेचं आहे.

तर अजून एक प्रश्न पुन्हा निर्माण होतो तो म्हणजे साधारण फ्लू आणि कोरोनाचा ताप कसा ओळखावा? यावर माझं उत्तर असतं मुळात का ओळखायचा. साधारण फ्लू आर व्हॅल्यू 1.3 कोरोनाची आऱ व्हॅल्यू 2.5. नुसत्या लक्षणांवरून ओळखणं कठीण आहे की साधारण फ्लू आहे ते. पहिला कोरोना ओळखणं सोपं होतं की त्यामध्ये वास न य़ेणं, चव न येणं ही वेगळी लक्षणं होती जी फ्लूमध्ये नव्हती. तुम्हाला जर जास्त रिस्क नसेल आणि तुम्हाला वाटत असेल कोरोना आहे तर लगेच टेस्ट करायची गरज नाही. टेस्ट, ट्रेस आणि आयसोलेशन हे आता काम करत नाही. त्याजागी बेस्ट, रेस आणि एलिमिनेट याने रिप्लेस केलं पाहिजे. यामध्ये बेस्ट लसीने हॉटस्पॉटला रेस करा आणि कोरोनाला एलिमिनेट करा.

हे वाचलं का?

लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर जर एखाद्याला कोरोना झाला तर त्याचं संक्रमण दुसऱ्याला होऊ शकतं का असाही प्रश्न अनेकांच्या मनात असतं. कोव्हिड नाकातून किंवा तोंडातून होतो. त्यावेळी त्याला तिथेच ब्लॉक करण गरजेचं होतं. मात्र व्हॅक्सिन एखाद्या रूग्णाच्या संरक्षणासाठी तयार केली. त्यामुळे जर लस घेतली तुम्हाला धोकादायक आजार होणार नाही याची शाश्वती देण्यात येतेय. पण तुम्हाला सौम्य कोरोना होऊ शकतो. जर तुम्ही कोव्हिशील्डचा पहिला डोस घेतला त्यानंतर 22 दिवसांपासून गंभीर आजार होण्यासापासून संरक्षण मिळतं. हे संरक्षण 90 दिवस टिकतं. त्यामुळे दुसरा डोस 90 दिवस पुढे ढकलला तरी चालेल. आणि जेवढा डोस पुढे ढकलतो तेवढी त्याची एफिकसी वाढते. तुमच्यामुळे इतरांना कोरोना होण्यासाठी पहिला तुम्हाला कोरोना व्हावा लागतो. मात्र लस घेऊनही कोनरोना झाला तर इतरांना काय सांगाल की लस घेतली म्हणून मी वाचलो, मला न्यूमोनिया नाही झाला. कोव्हिशिल्ड घेतल्यावर 67टक्के लक्षण विरहीत संक्रमणापासून संरक्षण दिसून आलंय.

18 वर्षांच्या वरील मुलांना लसीकरण देण्याच्या मुद्द्यावर माझं मत आहे की, तरूणांना कोरोना होण्याचा धोका किती आहे आणि लसीचा फायदा किती आहे. फार तरूण असणाऱ्यांना कोरोनाचा धोका कमी असतो. मात्र कोरोनासाठी तरूण मंडळीच काम करतायत. तर तरूणांनी लस घेतली पाहिजे. माझ्या मताने 60 वर्षांवरील व्यक्तींनी कोणतीही लस घ्यावी. 30 च्या खालील फायझर आणि मॉडर्ना घ्या ज्या लवकरच भारतात येतायत. 30-60च्या मध्ये असणाऱ्या व्यक्तींनी फायझर आणि मॉडर्ना 3 आठवड्यांच्या आत मिळत असेल तर घ्या किंवा इतर कोणतीही घ्या.

ADVERTISEMENT

लस कोणती घ्यावी यावर बोलयाचं झालं तर एक डोस घेतल्यानंतर कोरोना झाला तर तुम्हाला बूस्टर मिळाल्यासारखं आहे. आपण असं म्हणून एक कोव्हिशील्डचा डोस घेतला तर दुसरा एम आऱ एनचा दुसरा डोस घेतला तरी चालेल. कोरोनाची लस घेतला एफिकसी बघा. तर एक डोस वेगळ्या लसीचा आणि दुसरा डोस वेगळ्या लसीचा असं घ्यायचं म्हटलं तर वेगवेगळ्या लसी या विविध पद्धतीने काम करतात. यामध्ये कोव्हॅक्सिन ही whole virus लस आहे. ही लस सगळ्या म्युटेशनच्या विरूद्ध चालते. मात्र यासाठी डाटा वैद्यकीय क्षेत्रातून मिळणंही गरजेचं आहे.

ADVERTISEMENT

कोरोना झाल्यानंतर लस केव्हा घ्यावी तर जास्त अँटीबॉडी हव्या असतील तर कोरोनाची लस घेतली पाहिजे. यामध्ये तुम्ही 90 दिवसांचं अंतर ठेऊ शकता. मुळात एकदा का तुम्ही कोव्हिड रिकव्हर झाला की तुम्ही कधीही लस घेऊ शकता शिवाय 3 महिने थांबूही शकता.

अनेकजण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमीन सी घेतात. मात्र व्हिटॅमीन सी हे वॉटर सोलेबल व्हिटॅमीन आहे. त्यामुळे शरीराला नको असल्यास ते लघवीवाटे बाहेर पडतं. मात्र माझ्यामताने त्यामुळे काहीही फरक पडत नाही. मुळात मनातली भीती काढून टाका. भिती काढून टाकली की रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. त्यातप्रमाणे कोरोनातून रिकव्हर झाल्यानंतर टेस्ट करायची देखील गरज नाही.

रेमडिसीवीर औषधाबद्दल बोलायचं झालं तर याचा पुरवठा वाढण्यासाठी सप्लाय वाढावा किंवा त्याची मागणी कमी करा. 5 दिवसांच्यावर हे औषधं वापरून काही उपयोग होत नाही. हे अंटी व्हायरल औषधं आहे. तर ज्या रूग्णांना ऑक्सिजनची गरज आहे त्यांना हे औषधं द्यावं. ज्यांना ऑक्सिजनची गरज नाही त्यांना हे औषधं फायद्याचं नाही.

कोरोनाची लाट ही नक्कीच आणि लवकरच थांबणार आहे. कोव्हिशिल्डचा एक डोस घेऊन 21 दिवस झालेल्या व्यक्ती आणि मागच्या वर्षी आरटीपीसीआर पॉझिटीव्ह असलेले लोकं जर रूग्णालयात दाखल होत नसतील तर ही कोरोनाची लाट आपल्याला समजायच्या आत संपून जाईल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT