नागपुरात कोरोना मृत्यूचा उच्चांक, गेल्या 24 तासात किती जणांना गमावले कोरोनामुळे प्राण?
नागपूर: नागपूर जिल्ह्यात कोरोनामुळे गेल्या 24 तासात तब्बल 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेतील हा मृतांचा सर्वाधिक आकडा आहे. गेल्या 24 तासात नागपूर जिल्ह्यात 3630 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. काल (31 मार्च) नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपुरात असलेले कठोर निर्बंध समाप्त करत असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे नागपूरमध्ये आता […]
ADVERTISEMENT

नागपूर: नागपूर जिल्ह्यात कोरोनामुळे गेल्या 24 तासात तब्बल 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेतील हा मृतांचा सर्वाधिक आकडा आहे. गेल्या 24 तासात नागपूर जिल्ह्यात 3630 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
काल (31 मार्च) नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपुरात असलेले कठोर निर्बंध समाप्त करत असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे नागपूरमध्ये आता फक्त राज्य शासनाचे असलेले निर्बंधच लागू असतील असे स्पष्ट केले होते. पण या गोष्टीला 24 तासही उलटून गेले नाही तोच कोरोना मृतांचा हा नवा आकडा प्रशासनाची चिंता वाढवणारा ठरला आहे.
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नागपुरात 15 ते 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. यासंबंधी 11 मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन नितीन राऊत यांनी घोषणा केली होती. त्यानंतर हा लॉकडाऊन वाढविण्यात येणार अशी देखील चर्चा होती. मात्र, व्यापारी संघटना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचा विरोध लक्षात घेता नागपूरमध्ये 31 मार्चपर्यंत कठोर निर्बंध लावण्यात आले होते.
आता हे निर्बंध देखील हटविण्यात आले असून राज्य सरकारने कोरोनासंबंधी जे नवे नियम लागू केले आहेत तेच आता नागपूरमध्ये असणार आहे.









