राज्याच्या उपराजधानीत कोरोनाची भयावह परिस्थिती, वास्तव दाखवणारा ‘मुंबई तक’चा ग्राऊंड रिपोर्ट
नागपूर: नागपुरात (Nagpur) कोरोनाची (Corona) स्थिती इतकी भयानक आहे की रुग्णालयांमध्ये बेड (Hospital Bed) उपलब्ध नाही, व्हेंटिलेटर नाही की आयसीयू बेड (ICU) देखील नाही. एवढंच काय तर रेमडेसिवीर इंजेक्शनचा (Remdesivir) देखील मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. एकंदरीतच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरची आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटर वर गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ‘मुंबई तक’ने याबाबत जेव्हा एक […]
ADVERTISEMENT
नागपूर: नागपुरात (Nagpur) कोरोनाची (Corona) स्थिती इतकी भयानक आहे की रुग्णालयांमध्ये बेड (Hospital Bed) उपलब्ध नाही, व्हेंटिलेटर नाही की आयसीयू बेड (ICU) देखील नाही. एवढंच काय तर रेमडेसिवीर इंजेक्शनचा (Remdesivir) देखील मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. एकंदरीतच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरची आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटर वर गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ‘मुंबई तक’ने याबाबत जेव्हा एक ग्राऊंड रिपोर्ट (Ground Report) केला तेव्हा नागपुरातील नेमकी स्थिती काय हे समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
नागपुरातील जवळपास सर्वच रुग्णालयं पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. ‘मुंबई तक’ने जेव्हा शहरातील 25 ते 30 दवाखान्यांमध्ये कोरोना रुग्णासाठी बेड उपलब्ध आहे का? अशी अनेक ठिकाणी विचारणा केली तेव्हा फक्त चार ते पाच रुग्णालयांशी संपर्क होऊ शकला. यावेळी या रुग्णालयातून देखील एकच उत्तर मिळालं. ‘सध्या कुठलेच बेड उपलब्ध नाहीत.’ मग ते ऑक्सिजनचे असो, आयसीयू असो अथवा व्हेंटिलर असो.
रुग्णालयांना संपर्क केला असता काही रुग्णालयात तर 50 च्या वर रुग्ण हे वेटिंगवर असल्याचं सांगण्यात आलं. काही ठिकाणी वीस-पंचवीस रुग्ण वेटिंगवर आहेत अशी माहिती मिळाली.
हे वाचलं का?
Oxygen express : कोरोनाच्या अंधारात महाराष्ट्रासाठी नवा आशेचा किरण..
नागपुरातील जवळपास सर्वच रुग्णालयांचे हे वास्तव आहे. नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिस्थिती तर अत्यंत बिकट आहे. रुग्णांचे नातेवाईक सोमवारी सकाळी सात वाजेपासून आले असून दुपारचे तीन वाजले तरी रुग्णाला दाखल करण्यात आलं नव्हतं. रुग्णांच्या नातेवाईकांच्या मते रुग्णांची प्रकृती गंभीर झालेली असताना फक्त RT-PCR टेस्ट केली नसल्यामुळे रुग्णाला भरती करण्यात आलं नाही. रुग्णाच्या नातेवाईकांनी यावेळी अशी तक्रार केली आहे की, रुग्णाची प्रकृती गंभीर असताना देखील त्याच्यावर साधे उपचार देखील करण्यात आलेली नाही. यावेळी रुग्णालयांमध्ये जागाच शिल्लक नाही. असं कारण डॉक्टर सांगत आहेत.
ADVERTISEMENT
डॉक्टरांच्या मते, कोरोनाच्या पहिला लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेतील कोरोना व्हायरसची इन्फेक्शनचे प्रमाण हे फार जास्त आहे. यातही चाळीस ते पंचेचाळीस वयोगटातील रुग्णांची संख्या मोठी आहे. तसंच आमच्याकडे ऑक्सिजनचा पुरवठा कमी आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून ऑक्सिजन पुरवठा बंद आहे. यामुळे पेशंटला त्याच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे. तसंच लसीकरण देखील अत्यंत आवश्यक असल्याचं मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. लसीकरण जितक्या लवकर पूर्ण होईल तितका लोकांना फायदा होईल आणि हर्ड इम्युनिटी वाढेल.
ADVERTISEMENT
दुसऱ्या लाटेत कोरोनाची तरुणांना सर्वाधिक लागण?, पाहा काय खरं काय खोटं!
नागपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काही दिवसांपूर्वीच एकाच बेडवर दोन रुग्णांवर उपचार असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली होती. त्यातच आता नागपूरची परिस्थिती इतकी भयानक झाली आहे कि, रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नाहीत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर असे दिसून आले की रुग्णांना अक्षरश: दुचाकीवर बसवून त्यांच्यावर उपाय केले जात होते.
नागपुरातील रुग्णालयांमध्ये 19 एप्रिल दुपारपर्यंत बेड उपलब्धतेची काय स्थिती होती?
शासकीय आणि खासगी रुग्णालय मिळून ऑक्सिजनचे 35 बेड, आयसीयूचे फक्त 3 बेड उपलब्ध आहेत. तर एकही व्हेंटिलर बेड उपलब्ध नाहीए. सर्वात महत्वाचे म्हणजे शासकीय आकड्यानुसार नागपुरात गेल्या नऊ दिवसांपासून व्हेंटिलर बेड उपलब्ध नसल्याचं समोर आलं आहे.
‘रेमडेसिवीर इंजेक्शन काही ‘संजीवनी’ नाही, त्याने मृत्यूदरही कमी होत नाही, फक्त…’
नागपुरात सध्या 70,397 अॅक्टिव्ह रुग्णसंख्या असून आतापर्यंत नागपुरात तब्बल 6,386 रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. आतापर्यंत 3,29,470 इतकी रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. दरम्यान, काल (19 एप्रिल) नागपुरात तब्बल 113 रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमावावा लागला आहे. मृतांचा एका दिवसातील हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे.
अशातच दर दिवशी वाढत असलेली रुग्णसंख्या आणि होत असलेले मृत्यू यामुळे राज्याच्या उपराजधानीची परिस्थिती ही अत्यंत बिकट होत असल्याचं दिसून आलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT