प्रयागराजमध्ये गंगेच्या किनारी ‘या’ कारणामुळे पुन्हा दिसू लागले आहेत मृतदेह
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंगेमध्ये मृतदेह वाहिले होते. तसंच अनेक मृतदेह गंगा किनारी पुरण्यातही आले. या सगळ्यावरून मोदी सरकार आणि योगी सरकारवर टीकाही झाली. आता पुन्हा एकदा गंगेच्या किनारी मृतदेह दिसू लागले आहेत. याचं कारण हे आहे ते म्हणजे यावरच्या हटवण्यात आलेल्या चादरी..कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उत्तर प्रदेशात कहर माजवला. प्रयागराजमध्ये गंगेच्या किनाऱ्यांवरच अनेक मृतदेह पुरण्यात आले […]
ADVERTISEMENT
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंगेमध्ये मृतदेह वाहिले होते. तसंच अनेक मृतदेह गंगा किनारी पुरण्यातही आले. या सगळ्यावरून मोदी सरकार आणि योगी सरकारवर टीकाही झाली. आता पुन्हा एकदा गंगेच्या किनारी मृतदेह दिसू लागले आहेत. याचं कारण हे आहे ते म्हणजे यावरच्या हटवण्यात आलेल्या चादरी..कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उत्तर प्रदेशात कहर माजवला. प्रयागराजमध्ये गंगेच्या किनाऱ्यांवरच अनेक मृतदेह पुरण्यात आले होते. हे मृतदेह वाळू हटल्यामुळे पुन्हा दिसू लागले आहेत. ज्यानंतर प्रयागराजच्या महापालिकेतर्फे या मृतदेहांवर पुन्हा वाळू टाकण्यात येते आहे आणि ते पुरण्यात येत आहेत. या मृतदेहांवर टाकण्यात आलेल्या चादरी आणि बाजूला लावण्यात आलेले बांबूही काढण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
गंगा किनारी सापडले तब्बल 2 हजार मृतदेह, हादरवून टाकणारा ग्राऊंड रिपोर्ट!
एकीकडे गंगेत वाहून गेलेल्या मृतदेहांसोबतच गंगा किनारी पुरण्यात आलेल्या मृतदेहांवरूनही राज्य सरकारवर टीका झाली. अशात आता जे मृतदेह पुरण्यात आले आहेत त्यांची अवस्था भीषण झाली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे या मृतदेहांवरची वाळू उडून जाते आहे. त्यामुळे पुरण्यात आलेले मृतदेह पुन्हा दिसू लागले आहेत. काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये भटके कुत्रे या मृतदेहांचे लचके तोडताना दिसत आहेत. ज्या ठिकाणी हे मृतदेह पुरण्यात आले होते तिथे चादरी लावण्यात आल्या होत्या. त्याही काढण्यात आल्या आहेत त्यामुळे हे मृतदेह वारंवार समोर येत आहेत.
हे वाचलं का?
ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयागराजचे महापौर आणि महापालिका प्रशासन कामाला लागलं आहे. महापालिकेच्या पथकाकडून हे मृतदेह झाकले जात आहेत. तसंच जे कुणी इथे मृतदेह पुरण्यासाठी येत आहेत त्यांना मृतदेह पुरू नयेत असंही आवाहन करण्यात येतं आहे. ज्या लोकांमध्ये मृतदेह पुरण्याची परंपरा आहे त्यांना वेगळ्या जागा नेमून दिल्या आहेत. तसंच स्मशानभूमींमध्ये लाकडांची मोठ्या प्रमाणावर व्यवस्था करण्यात आली आहे जेणेकरून मृतदेहांवर अंत्यसंस्कार योग्य पद्धतीने केले जावेत.
संतापजनक घटना… एकाच रुग्णवाहिकेत कोंबले 22 कोरोना रुग्णांचे मृतदेह
ADVERTISEMENT
गंगेच्या किनारी जे मृतदेह पुरण्यात आले त्याआधी अनेक मृतदेह उत्तर प्रदेशच्या नदीच्या पाण्यात पाहण्यास मिळाले. गंगेत वाहणारे हे मृतदेह हे देशासाठी भीषण असं चित्र होतं. यावरून वादही निर्माण झाला. विरोधी पक्षांनी यावरून मोदी सरकारवर कडाडून टीकाही केली गेली. त्यात आता मृतदेह पुन्हा समोर येत आहेत.
ADVERTISEMENT
हिंदू प्रथेप्रमाणे प्रयागराजमध्ये बहुतांश प्रेतांवर अंत्यसंस्कार स्मशानातच केले जातात. काही समाजांमध्येच फक्त मृतदेह पुरण्याची प्रथा आहे. मात्र उत्तर प्रदेशात कोरोनाचा कहर पाहण्यास मिळाल्यानंतर मृतदेह पुरणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. स्थानिकांचं असं म्हणणं आहे की इतक्या वर्षांमध्ये गंगा किनारी आम्ही असं चित्र कधीही पाहिलेलं नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT