कोरोनाने वाढवली धास्ती.. आता आणखी कठोर निर्बंध
मुंबई: देशभरात कोरोना व्हायरसचे रुग्ण हे सातत्याने वाढत आहेत. राज्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख चढताच असल्याचं दिसून आल्याने धास्ती वाढली आहे. सध्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन देखील करण्यात आला आहे. याशिवाय राज्य सरकारने आता 31 मार्चपर्यंत मुंबईसह संपूर्ण राज्यासाठी नवी नियमावली जारी केली आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने आता पुन्हा एकदा अनेक […]
ADVERTISEMENT
मुंबई: देशभरात कोरोना व्हायरसचे रुग्ण हे सातत्याने वाढत आहेत. राज्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख चढताच असल्याचं दिसून आल्याने धास्ती वाढली आहे. सध्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन देखील करण्यात आला आहे. याशिवाय राज्य सरकारने आता 31 मार्चपर्यंत मुंबईसह संपूर्ण राज्यासाठी नवी नियमावली जारी केली आहे.
ADVERTISEMENT
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने आता पुन्हा एकदा अनेक गोष्टींवर निर्बंध घातले आहेत.
पाहा ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्रात काय-काय असणार निर्बंध
1. राज्यातील सर्व सिनेमागृह (सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्स), हॉटेल्स / रेस्टॉरंट हे 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.
हे वाचलं का?
-
मास्क न घातलेल्या लोकांना प्रवेश देण्यात येणार नाही. प्रवेश करताना प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचं तापमान तपासलं जाईल.
योग्य ठिकाणी सॅनिटायझरचा पुरवठा करण्यात यावा
ADVERTISEMENT
मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात आहे की नाही, यासाठी माणसं नेमण्यात यावीत.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात दिवसभरात १५ हजारांपेक्षा जास्त नवे Corona रुग्ण
2. सर्व शॉपिंग मॉलसाठी देखील वरील नियमच लागू असणार आहेत.
3. मोठ्या प्रमाणात गर्दी होईल अशा प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रम घेण्यास बंदी. याबाबत निर्बंध न पाळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसंच जिथे या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेलं असेल त्या ठिकाणांवर देखील कायदेशीर कारवाई केली जाईल.
4. लग्न समारंभासाठी फक्त 50 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी
5. अंत्य संस्कारासाठी फक्त 20 जणांना उपस्थित राहता येणार.
महाराष्ट्रात पुन्हा Lockdown लागणार का? राजेश टोपे म्हणतात…
6. होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्यांनी पुढील नियम पाळावेत:
-
कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात यावी. यावेळी रुग्णावर आयसोलेशन दरम्यान कोणत्या डॉक्टरकडून उपचार सुरु आहेत याबाबतची माहिती देखील कळविण्यात यावी.
-
ज्या घरामध्ये कोरोना रुग्ण आहे तिथे 14 दिवसांसाठी घराबाहेर त्यासंबंधी पाटी लावण्यात यावी.
-
होम क्वॉरंटाइन असणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या हातावर तसा स्टॅम्प मारण्यात यावा.
-
रुग्णांच्या कुटुंबीयांनी घराबाहेर ये-जा करणं शक्यतो टाळावं. मास्कचा वापर काटेकोरपणे करण्यात यावा.
-
वरील नियम मोडल्यास रुग्णांना स्थानिक प्रशासनाकडून तात्काळ कोविड केअर सेंटरमध्ये नेण्यात येईल.
7. अत्यावश्यक सेवा आणि आरोग्य सेवेशी संबंधित कार्यालये वगळता इतर सर्व ठिकाणी 50 टक्के क्षमतेने कार्यालये सुरु ठेवावीत.
-
वर्क फ्रॉर्म होमला प्राधान्य देण्यात यावं.
-
ऑफिसमध्ये मास्कचा वापर अनिवार्य आहे.
-
नियम मोडणाऱ्या कार्यालयांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT