Kumbh Mela : हरिद्वारमध्ये कोरोनाचा कहर, दर सव्वा मिनिटाला एक पॉझिटिव्ह केस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कुंभनगरी हरिद्वारमध्ये कोरोनाचा कहर पाहण्यास मिळतो आहे. कुंभमेळा प्रतीकात्मक पद्धतीने साजरा करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केलं आहे तरीही हरिद्वारमध्ये कुंभमेळा आणि त्याला जमलेली गर्दी ही कोरोनाचा कहर वाढवणारी ठरली आहे. चैत्र पौर्णिमेला जी स्नान पर्वणी होती त्याला जमलेल्या संतांमुळे कोरोनाचा कहर थांबताना दिसत नाहीये. हरिद्वारमध्ये दर सव्वा मिनिटाला एक पॉझिटिव्ह रूग्ण आढळतो आहे. हरिद्वारमध्ये चोवीस तासात 1175 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

ADVERTISEMENT

निरंजनी अखाड्याचे महामंडलेश्वर यांचं कोरोनाने निधन झालं. तसंच हरिद्वारमध्ये चार जणांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. हरिद्वारमध्ये आरोग्य व्यवस्था मोठ्या प्रमाणावर उभी करावी लागते आहे. त्यामुळे शहरात काहीसं भीतीचं वातावरण आहे. अनेकांपुढे हा प्रश्न आहे रूग्णालयात जायचं की नाही? कोरोना झालेले रूग्ण रूग्णालयात गेले तर त्यांना बेड मिळत नाही अशीही स्थिती आहे.

अशा सगळ्या वातावरणातही वैष्णव पंथीय शेवटच्या शाही पर्वणीच्या तयारीला लागले आहेत. त्याच दिवशी पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा सातवा टप्पाही पार पडणार आहे. या ठिकाणी आलेल्या अनेक शैव पंथीयांनी कुंभमेळा आवरता घेऊन तिथून काढता पाय घेतला आहे. शैव पंथीयांची तीन शाही स्नानं पार पडली आहेत. मात्र 14 एप्रिलला स्नानाची जी तिसरी पर्वणी पार पडली त्यानंतर हरिद्वारमध्ये कोरोनाचं संकट वाढलं आहे. मागील दहा दिवसांमध्ये कोरोना रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.

हे वाचलं का?

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार बीएचईएल मध्ये 48, शिवलिक नगरमध्ये 13, कनखलमध्ये 10, नवोदय शाळेत 8, आयआयटी रूरकी मध्ये चार, जूना आणि निरंजनी आखाड्यात 11 जणांना कोरोना झाला आहे. तर संपूर्ण हरिद्वारमध्ये 1175 कोरोना रूग्ण मागील 24 तासात पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे हरिद्वारमध्ये दर सव्वा मिनिटाला एक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळत असल्याचं चित्र दिसून येतं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT