साथ मरेंगे म्हणत प्रेमी युगुलाने घेतला गळफास, तरुणाचा मृत्यू; दोर तुटल्यामुळे विवाहीत महिला वाचली
तीस वर्षीय विवाहीत महिलेसोबत फेसबूकवरुन प्रेम जुळलेल्या २७ वर्षीय युवकाने गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. विवाहीत महिलेच्या पतीला या प्रकरणाबद्दल माहिती समजताच या युगुलाने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ज्यात जयपाल वाव्हळ या तरुणाचा मृत्यू झाला असून विवाहीत महिला मात्र दोर तुटल्यामुळे बचावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील भेंड येथे राहणाऱ्या जयपालचे कल्याण येथील […]
ADVERTISEMENT
तीस वर्षीय विवाहीत महिलेसोबत फेसबूकवरुन प्रेम जुळलेल्या २७ वर्षीय युवकाने गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. विवाहीत महिलेच्या पतीला या प्रकरणाबद्दल माहिती समजताच या युगुलाने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ज्यात जयपाल वाव्हळ या तरुणाचा मृत्यू झाला असून विवाहीत महिला मात्र दोर तुटल्यामुळे बचावली आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील भेंड येथे राहणाऱ्या जयपालचे कल्याण येथील ३० वर्षीय विवाहीत महिलेसोबत फेसबूकवरुन प्रेमसंबंध जुळून आले. दोन दिवसांपूर्वी ही महिला कल्याणवरुन भेंडला आली होती. परंतू याचवेळी विवाहीत महिलेच्या पतीला या गोष्टीबद्दल माहिती समजली. विवाहीत महिलेच्या पतीने आपल्या पत्नीला पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची माहिती दिली.
धक्कादायक! बारामतीत केसरी टूर्सच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलेवर चाकू हल्ला
हे वाचलं का?
यानंतर प्रेमी युगुलाने भीतीपोटी साथ मरेंगे या इराद्याने सोमवारी १७ जानेवारीला गळफास घेऊन आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. यावेळी जयपाल या तरुणाचा मृत्यू झाला असून विवाहीत महिला दोर तुटल्यामुळे बचावली आहे. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
नांदेडमधल्या हदगावात बेकायदा खोदकाम सुरू असताना सापडला महिलेचा मृतदेह
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT