अमरावतीत तरूणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्याचा धक्कादायक प्रकार, आरोपीला १० वर्षांची शिक्षा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अमरावतीत तरूणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेण्यात आल्याची धक्कादायक घटना दीड वर्षापूर्वी घडली होती. अमरावतीमध्ये झालेल्या या धक्कादायक प्रकाराचा निषेधही मोठ्या प्रमाणावर नोंदवण्यात आला होता. लॅब टेक्निशियन म्हणून काम करणाऱ्या अलकेश नावाच्या आरोपीने कोरोना चाचणीसाठी तरूणीचे घशातून स्वॅब घेतल्यानंतर तिच्या गुप्तांगातूनही स्वॅब घेतल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर पीडित तरूणीने पोलिसात तक्रार केली, ज्यावरून अलकेशला अटक करण्यात आली. आता कोर्टाने या प्रकरणी निकाल दिला असून अलकेशला दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

ADVERTISEMENT

आरोपी अलकेश विरोधातला गुन्हा सिद्ध झाल्यानंतर कोर्टाने त्याला दहा वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. आरोपील अलकेश याच्या विरोधात बडनेरा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.

काय आहे प्रकरण –

हे वाचलं का?

अमरावतीत ऑफिसमधील सहकाऱ्याला करोनाची लागण झाल्याने 28 जुलै 2020 रोजी तरुणी कोरोना चाचणी करण्यासाठी गेली होती. नोकरीनिमित्ताने अमरावतीमधील आपल्या भावाकडे ती राहत होती. तिच्यासोबत इतरांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. पण नंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगत तिला परत बोलावण्यात आलं.

आरोपीने तरुणीला युरिनल चाचणी करावी लागेल असं सांगितलं. यावेळी तरुणीसोबत तिची महिला सहकारीदेखील होती. त्यांनी महिला कर्मचारी आहेत का ? असं विचारलं असता आरोपीने नकार दिला. यानंतर त्याने गुप्तांगातून स्वॅब घेतले आणि रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं सांगितलं. पण अशा पद्धतीने गुप्तांगातून नमुने घेतल्याबद्दल शंका आल्याने तरुणीने आपल्या भावाला सांगितलं. यानंतर त्यांनी डॉक्टरांकडे चौकशी केली असता त्यांनी अशा पद्धतीने नमुने घेत नसल्याचं सांगितलं. नंतर पीडित तरूणीने तिच्या भावासह पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. पोलिसांनी तपासानंतर अलकेशला बेड्या ठोकल्या होत्या. आता कोर्टाने या प्रकरणी अलकेशला दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT