उप-राजधानीला कोरोनाचा विळखा कायम ! दिवसभरात ३ हजार २३५ नवे रुग्ण
गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरात वाढत असलेली कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. गेल्या २४ तासांत नागपुरात कोरोनाचे ३ हजार २३५ नवे रुग्ण सापडले आहेत. याचसोबत ३५ जणांना कोरोनाशी लढताना आपले प्राण गमवावे लागले आहेत. गुरुवारी सापडलेल्या रुग्णांपेक्षा शुक्रवारी सापडलेल्या रुग्णांची संख्या कमी असली तरीही मृतांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे येणाऱ्या काळात नागपूर […]
ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरात वाढत असलेली कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. गेल्या २४ तासांत नागपुरात कोरोनाचे ३ हजार २३५ नवे रुग्ण सापडले आहेत. याचसोबत ३५ जणांना कोरोनाशी लढताना आपले प्राण गमवावे लागले आहेत. गुरुवारी सापडलेल्या रुग्णांपेक्षा शुक्रवारी सापडलेल्या रुग्णांची संख्या कमी असली तरीही मृतांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे येणाऱ्या काळात नागपूर शहरासाठी विशेष कठोर उपाययोजना अमलात आणण्याचं आव्हान राज्य सरकारसमोर असणार आहे.
ADVERTISEMENT
नागपुरात १५ ते २१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे तरीही लॉकडाऊनला हरताळ फासल्याचं चित्र नागपुरात दिसून येतं आहे. कारण लोकांनी रस्त्यांवर गर्दी केली आहे. लॉकडाऊनचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत लॉकडाऊन हा फक्त कागदावरच उरला आहे हेच चित्र नागपुरात पाहण्यास मिळतं आहे.
हे वाचलं का?
नागपुरातल्या रस्त्यांवरची वर्दळ पाहून कुणीही हे म्हणणार नाही की नागपुरात कडक लॉकडाऊन लागला आहे. नागपुरात प्रशासनाने अनेक कठोर निर्बंध लादले आहेत. ज्यामध्ये दुपारी १ नंतर फक्त वैद्यकीय सेवा सोडून बाकी सगळं बंद राहणार आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवून कोरोना रूग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणता येईल हा यामागचा उद्देश आहे. परंतू नागपूरकर मुळीच ऐकायला तयार नाहीत, ते खुशाल नियम मोडत आहेत. अशात पोलिसांनी आता नियम मोडणाऱ्यांवरही कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT