चिंता कायम, राज्यात आज कोरोना बळींचा उच्चांक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यभरात कोरोनाने कहर माजवलाय. दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत असून सर्व परिस्थिती चिंताजनक बनलीये. अशातच आज राज्यात कोरोनामुळे 974 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात आज सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून याआधी राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने मृत्यूची नोंद झालेली नव्हती. त्यामुळे सरकारी यंत्रणांसमोरचं टेन्शन कायम आहे.

ADVERTISEMENT

राज्यातील आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात 34,389 नवीन रुग्णांचं निदान करण्यात आलं आहे. तर आजच्या दिवशी 974 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.52% एवढा आहे.

Tauktae Cyclone Alert : मुंबईत सोमवारी लसीकरण बंद राहणार – महापालिकेची माहिती

हे वाचलं का?

याशिवाय आज 59,318 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 89.74% एवढे झालं आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 48,26,371 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याची माहिती आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 53,78,452 झाली आहे. राज्यात सध्याच्या घडीला 4,68,109 ॲक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आहे.

मुंबईत गेल्या 24 तासांत बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या अधिक

ADVERTISEMENT

तर मुंबईमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 1544 बाधित रूग्ण सापडल्याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत मुंबईमध्ये बाधित रूग्णसंख्येपेक्षा बरं होणाऱ्या रूग्णांची संख्या अधिक असल्याचं लक्षात आलंय. मुंबईत गेल्या 24 तासांत 2438 कोरोनाबाधित रूग्ण बरे देखील झालेत. तौकताई चक्रीवादळाच्या पार्श्भूमीवर मुंबई महापालिकेने सोमवारी शहरातलं लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 18 ते 20 मे या कालावधीत आता शहरात पुढचं लसीकरण केलं जाईल अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT