कोरोना विषाणूसंदर्भातील समज आणि त्यामागील सत्यता
देशात कोरोनाने कहर माजवलाय. दिवसेंदिवस रूग्णसंख्याही वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत अजूनही लोकांच्या मनात कोरोनाविषयी तसंच लसीकरणाविषयी काही समज किंवा गैरसमज दिसून येतायत. तर आपण जाणून घेऊया कोरोनासंदर्भातील लोकांच्या मनात असलेले समज आणि त्यामागील सत्यता. लस घेतलेल्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का? कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लसीची कार्यक्षमता दुसर्या डोसच्या दोन आठवड्यांनंतर मोजण्यात आली आहे. […]
ADVERTISEMENT
देशात कोरोनाने कहर माजवलाय. दिवसेंदिवस रूग्णसंख्याही वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत अजूनही लोकांच्या मनात कोरोनाविषयी तसंच लसीकरणाविषयी काही समज किंवा गैरसमज दिसून येतायत. तर आपण जाणून घेऊया कोरोनासंदर्भातील लोकांच्या मनात असलेले समज आणि त्यामागील सत्यता.
ADVERTISEMENT
लस घेतलेल्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का?
कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लसीची कार्यक्षमता दुसर्या डोसच्या दोन आठवड्यांनंतर मोजण्यात आली आहे. दरम्यान या कालावधीमध्ये कोणत्याही व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. अभ्यासातून असं लक्षात आलं आहे की, दोन लसींचे डोस घेतल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. त्यामुळे लसीकरणानंतर कोरोनाच्या संक्रमणाची शक्यता कमी होते. लसीकरणामुळे लक्षणं असलेल्या कोव्हिडला प्रतिबंध होऊ शकतो. पण जरी व्यक्तीने लस घेतली असेल तरीही त्याच्या शरीरात कोरोना व्हायरसचे विषाणू असू शकतात.
हे वाचलं का?
कोरोना व्हायरस हवेतून पसरतो का?
उपलब्ध असलेल्या डेटाच्या माध्यमातून कोरोनाचा विषाणू ड्रॉपलेट (थेंब) मधून पसरत असल्याचं लक्षात आलंय. हा विषाणू तेव्हाच पसरतो ज्यावेळी लोकं योग्य पद्धतीने मास्कचा वापर करत नाहीत. त्यामुळे मास्कचा वापर योग्य पद्धतीने करा, खोकताना काळजी घ्या आणि हातांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका. या तीन गोष्टींमुळे कोरोनाला प्रतिबंध करता येऊ शकतो.
ADVERTISEMENT
बंद खोलीत ऑक्सिजन concentratorचा वापर करणे सुरक्षित आहे का?
ADVERTISEMENT
एखाद्या खोलीत ऑक्सिजन concentratorचा वापर करत असताना ऑक्सिजनची पातळी कमी होण्याचा धोका नाही. छातीविकारतज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी हवेशीर खोली असणं चांगलं, परंतु ऑक्सिजन concentratorचा वापरासाठी असा कोणताही सल्ला देण्यात आलेला नाही.
‘Covipri’ या बनावट रेमेडिसीवीर इंजेक्शनची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे
‘Covipri’ हे बनावट औषध आहे मात्र ते रेमेडिसीवीर इंजेक्शन नाही. दिल्ली पोलिसांनी लोकांना इशारा दिला आहे की, ‘Covipri’ असं कोणतंही रेमडेसीवीर इंजेक्शन अस्तित्त्वात नाही.
20 सेकंदांपेक्षा जास्त काळ आपला श्वास रोखून धरल्यास कोरोनाचा धोका टळतो?
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीप्रमाणे, न खोकला, छातीत अस्वस्थता न जाणवता जर तुम्ही 10 सेकंद श्वास रोखून धरत असाल याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कोरोनाचा धोका नाही.
हाताच्या 7 प्रकारच्या व्यायामांमुळे आजीवन कधीही कोरोना होणार नाही
असा कोणताही पुरावा नाही जे हे सिद्ध करू शकतो की हाताच्या 7 प्रकारांच्या व्यायामामुळे एखाद्या व्यक्तीला आय़ुष्यात कधीच कोरोनाचा संसर्ग होणार नाही. मध्य प्रदेशच्या आरोग्य विभागाने ही माहिती खोटी आणि चुकीची असल्याचं म्हटलंय.
ऑक्सिजन सिलेंडरला पर्याय म्हणून नेब्युलायझरचा वापर केला जाऊ शकतो.
ऑक्सिजन सिलेंडरला पर्याय म्हणून नेब्युलाझरचा वापर केला जाऊ शकत नाही. डॉक्टरांनी यासंदर्भातील व्हायरल व्हिडीयो पाहून ही माहिती चुकीची असल्याचं म्हटलंय.
लिंबाचे थेंब नाकात टाकणं
काहींच्या मानण्याप्रमाणे नाकात लिंबाचे दोन थेंब टाकल्यास ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होते. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्याप्रमाणे, याबाबत कोणताही पुरावा नाही.
पॅरासिटामॉलचा वापर
डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, दिवसाला 2 ते 3 ग्रॅमपेक्षा जास्त पॅरासिटामॉल घेणं धोकादायक ठरू शकते. यामुळे रुग्णाचं आरोग्य बिघडू शकतं. हे लक्षात ठेवलं पाहिजे की पॅरासिटेमॉल जास्त वेळा घेऊ नये.
अँटीबायोटीक्सचा वापर
काहीजण असा दावा करतात की अँटीबायोटिक्सचा वापर केल्यास कोविडट्या विषाणूविरूद्ध लढायला मदत होते. हा दावाही चुकीचा आहे. बॅक्टेरियामुळे होणा-या रोगांमध्ये अँटीबायोटीक्स औषधे दिली जातात. परंतु हा रोग व्हायरसमुळे होतो.
कापूर, निलगीरी तेल आणि celery (एक वनस्पती) यांच्या मिश्रणाचा वापर
काहींच्या मानण्याप्रमाणे या तीन गोष्टींच्या मिश्रणाने ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होते. मात्र अमेरिकेतील एका आऱोग्य एजन्सीच्या म्हणण्याप्रमाणे हा दावा चुकीचा आहे.
सार्वजनिक पाण्यात जर SARS-CoV-2 विषाणू मिश्रीत झालेला असेल तर संपूर्ण समाजाला त्याची लागण होऊ शकते.
आतापर्यंत केलेल्या संशोधनातून असं कुठेही लक्षात आलेलं नाही की कोरोनाचा विषाणू पाण्यामार्फत पसरू शकतो. हा वॉटरबॉर्न रोग नव्हे. मात्र स्विमींग पूलमध्ये जाताना व्यक्तींनी काळजी घेणं गरजेचं आहे. कारण इतर व्यक्तींच्या खोकल्यातून किंवा शिंकण्यातून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो.
गरम पाणी प्यायल्याने आणि गरम पाण्याने अंघोळ केल्यास कोरोना होत नाही.
गरम पाणी प्यायल्याने साधी सर्दी बरी होऊ शकते असं समोर आलेलं आहे. यामुळे सर्दीती लक्षणं दिसत नाही. कधीकधी यामध्ये मानसिक आराम मिळतो ज्यामुळे लक्षणं दिसत नाहीत. पण गरम पाणी पिण्यामुळे शरीरात कोरोना व्हायरस नष्ट होत नाही किंवा रोगंही बरा होत नाही.
कोरोना प्रतिबंधक लसीने मासिक पाळीच्या चक्रावर किंवा प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो?
मासिक पाळीच्या पाच दिवस अगोदर महिलांनी लस घेऊ नये कारण रोगप्रतिकार शक्ती कमी असते अशी चुकीची माहिती परसली होती. मात्र अमेरिकन कॉलेज ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकोलॉजी अहवालानुसार, लसीकरणाचा प्रजनन क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे मासिक पाळीदरम्यान रोगप्रतिकार शक्ती कमी होत नाही. त्यामुळे मासिकपाळी दरम्यान लस घेण्यास हरकत नाही.
कोरोनाचा विषाणू डासांमुळे पसरतो का?
कोरोनाचा विषाणू डासांमुळे पसरतो याबाबत कोणताही पुरावा नाही. हा व्हायरस व्यक्तीच्या खोकण्यातून, शिंकण्यातून आणि लाळेतून पसरतो.
कपड्यांद्वारे कोरोनाचा विषाणू पसरत नाही याची खात्री कशी बाळगावी?
आपण आपले कपडे डिटर्जंट किंवा साबण वापरुन 60-90 डिग्री सेल्सियस गरम पाण्यात धुवावेत. त्यामध्ये ब्लीच घालावं. यानंतर ड्रायरमध्ये किंवा उन्हात कपडे सुकवावेत.
मद्यपान केल्याने कोरोनाचा धोका टळू शकतो का?
मद्यपान जसं की बियर, लिकर आणि वाईन प्यायल्याने कोरोना व्हायरससपासून प्रतिबंध होत नाही.
आपल्या शरीरावर अल्कोहोल किंवा क्लोरीनची फवारणी केल्यास शरीरातील विषाणू नष्ट होतो
असं केल्यास शरीराच्या आतमध्ये असलेला विषाणू नष्ट होत नाही. मात्र यामुळे कपडे, डोळे तसंच ओठ यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
लसूण खाण्याने कोरोनाचा धोका टळतो?
लसूणमध्ये काही अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आहेत. परंतु यामुळे कोरोनाचा धोका टळतो असा कोणताही पुरावा नाही.
सलाईन सोल्यूशनने नाक नियमित स्वच्छ केल्यास कोरोनाला प्रतिबंध केला जाऊ शकतो?
सलाईन सोल्यूशनने नाक स्वच्छ केल्यास सर्दीपासून लवकर बरे होण्यास मदत होते असा पुरावा आहे. परंतु श्वसनाचे रोग किंवा कोविड यांना प्रतिबंध होऊ शकत नाही.
लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होत नाही
कोणत्याची वयोगाटील व्यक्तीला कोरोनाची लागण होऊ शकते.
कोरोनाची लागण झालेला प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू होतो
हा समज चूक आहे.
ब्लीचने गुळण्या करून आपण कोरोनापासून संरक्षण करू शकतो.
ब्लीच कधीही तोंडात घेऊ नये किंवा त्याद्वारे गुळण्या करू नये. यामुळे शरीराचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
मास्कचा दिर्घकाळ वापर केल्याने ऑक्सिजनची कमतरता जाणवू शकते
मास्कचा दिर्घकाळ वापर केल्याने अस्वस्थता जाणवू शकते. मात्र यामुळे ऑक्सिजनची कमतरता जाणवते असं नाही. मास्क वापरताना ते योग्य पद्धतीने लावा आणि श्वास घ्यायला त्रास होणार नाही इतकं घट्ट असू द्या. डिस्पोसेजबल मास्क वापर पुन्हा पुन्हा करू नका
आपल्या सूपमध्ये किंवा इतर जेवणात मिरपूड घालणं कोविडला प्रतिबंधित करतं?
जेवणामध्ये मिरपूड घातल्याने जेवणाचा स्वाद वाढतो. मात्र मिरपूड कोरोनाला प्रतिबंध करू शकत नाही.
5जी मोबाईल नेटवर्कमुळे कोरोनाच्या विषाणूचा प्रसार होतो.
विषाणू मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून प्रसार करत नाही. कोविड अशा देशांमध्येही पसरतोय ज्यामध्ये 5जी नेटवर्क उपलब्ध नाही. हा विषाणू ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून पसरतो.
कोरोना झाला म्हणजे तो आयुष्यभर राहणार
कोरोना झालेले अनेक व्यक्ती कोरोनापासून मुक्त झाले आहेत. जर तुम्हाला कोरोना झाला तर त्यावर उपचार घ्यावेत. त्यामुळे लक्षणं आढळल्यास तातडीने डॉक्टरांची मदत घ्यावी.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT