Pornography Video Case : Crime Branch च्या अधिकाऱ्यांकडून शिल्पा शेट्टीची चौकशी
अश्लील व्हिडीओ बनवून ते Hotshot या मोबाईल App वर अपलोड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक केली आहे. याच प्रकरणात आज क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांशी शिल्पा शेट्टीचाही जबाब नोंदवला. पती राज कुंद्रा हा पोर्नोग्राफी रॅकेटमध्ये सहभागी असल्याची शिल्पा शेट्टीला माहिती होती का याबाबत पोलीस अधिकारी चौकशी करत आहेत. राज कुंद्राच्या पोलीस […]
ADVERTISEMENT
अश्लील व्हिडीओ बनवून ते Hotshot या मोबाईल App वर अपलोड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक केली आहे. याच प्रकरणात आज क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांशी शिल्पा शेट्टीचाही जबाब नोंदवला. पती राज कुंद्रा हा पोर्नोग्राफी रॅकेटमध्ये सहभागी असल्याची शिल्पा शेट्टीला माहिती होती का याबाबत पोलीस अधिकारी चौकशी करत आहेत.
ADVERTISEMENT
राज कुंद्राच्या पोलीस कोठडीत आज न्यायालयाने वाढ केली, २७ जुलैपर्यंत ही कोठडी वाढवून देण्यात आली. या प्रकरणात शिल्पा शेट्टीचाही सहभाग असल्याचा आरोप एका मॉडेलने केला होता. यानंतर क्राईम ब्रांचचे अधिकारी शिल्पा शेट्टीचा जबाब नोंदवण्यासाठी तिच्या घरी पोहचले. शिल्पा शेट्टीच्या सहमतीनेच पोलिसांनी तिचा जबाब नोंदवायला सुरुवात केली.
Viaan या कंपनीमार्फत राज कुंद्रा आपलं अश्लील व्हिडीओंचं रॅकेट चालवायचा. या कंपनीची संचालक शिल्पा शेट्टी होती. २०२० मध्ये तिने आपल्या पदाचा राजीनामा दिला. पोलिसांनी यावेळी शिल्पा शेट्टीला, अश्लील व्हिडीओंसदर्भात तुला काही माहिती आहे का? आणि अन्य काही प्रश्न विचारले. याचसोबत तिने संचालक पदाचा राजीनामा का दिला याबद्दलही तिला प्रश्न विचारण्यात आले. याचसोबत शिल्पा शेट्टीच्या बँक खात्यांचीही चौकशी करण्यात आली. पोर्नोग्राफी व्हिडीओ रॅकेटमधून मिळालेल्या पैशांच्या माध्यमातून शिल्पा शेट्टीच्या खात्यावर काही पैसे टाकले गेले का याचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत.
हे वाचलं का?
काही दिवसांपूर्वी क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी Viaan कंपनीच्या कार्यालयावर धाड टाकली होती. ज्यात पोलिसांना अश्लील व्हिडीओंनी भरलेला 20 TB Data सापडला होता. तसेच राज कुंद्रा याच्या अटकेनंतर सर्व्हरवरुन जवळपास 1 TB Date डिलीट करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी हा डेटा कोणी डिलीट केला याचा शोध घेत असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.
Mercury international नावाच्या एका बेटींग कंपनीमधून खूप मोठी रक्कम राज कुंद्रा याच्या खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली होती. ज्याचे धागेदोरे पोलिसांना मिळाले आहेत. त्यामुळे अश्लील व्हि़डीओंमधून मिळवलेला पैसा राज कुंद्रा क्रिकेट बेटींगमध्ये वळवत होता का याचा तपास आता पोलीस अधिकारी करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT