महाराष्ट्राच्या सीटी व्हॅल्यू बदलण्याच्या प्रस्तावाला आयसीएमआरचा विरोध

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई तकः इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) चे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी महाराष्ट्राचे आरोग्य सचिव बलराम भार्गव यांनान पत्र लिहिलंय. त्यात त्यांनी म्हटलंय की, ‘कोव्हिड चाचणी करण्यासाठी कमी ठिकाणं असल्याने रोगाचा प्रसार दर मोठ्या प्रमाणावर वाढेल. ‘पॉझिटिव्हिटी मापदंडाबाबत फेरविचार केल्याने संक्रमित झालेले रुग्ण सुटतील आणि त्यातून संक्रमण पसरेल’ असं या पत्रात नमूद करुन पॉझिटिव्हिटी ठरवण्याच्या मापदंडांबाबत बदल करण्यास नकार दिला आहे.

ADVERTISEMENT

कोरो रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने महाराष्ट्राने केंद्राला पत्र लिहिलं होतं. ज्यामाध्यमातून कोव्हिडच्या चाचण्यांसाठीचे निकषांबाबत फेरविचार करण्याची विनंती महाराष्ट्राने केंद्राला केली आहे. रुग्ण ओळखण्यासाठी सीटी व्हॅल्यू कमी करण्याची विनंती महारष्ट्राकडून करण्यात आलीय. याला आयसीएमआरने उत्तर देताना म्हटलंय की, ” पॉझिटिव्हिटी मापदंडाबाबत फेरविचार करण्यात संक्रमित झालेले रुग्ण सुटतील आणि त्यातून संक्रमण पसरेल. असं सांगत सीटी व्हॅल्यू बदलण्यास आयसीएमआरने नकार दिलाय.

आयसीएमआरच्या मते, सध्याचे पॉझिटिव्हिटी निकष सायकल थ्रेशोल्ड (सीटी) वर आधारित आहेत. ज्यावरुन शरीरारात कोव्हिडचं किती इन्फेक्शन आहे ते लक्षात येते.

हे वाचलं का?

आयसीएमआरने 5 एप्रिलला लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, “35 किंवा त्याहून कमी सीटी मूल्याचे सर्व रूग्ण कोव्हिड पॉझिटिव्ह मानले जाऊ शकतात, तर 35 पेक्षा जास्त सीटी मूल्य असणारे रुग्ण नकारात्मक मानले जाऊ शकतात. सीटी मूल्य 35 किंवा त्यापेक्षा कमी असणारे सर्व नमुने पुन्हा तपासले पाहिजे. त्या प्रमाणेच ज्या रुग्णाची सीटी व्हॅल्यू 24 पर्यंत येते त्या रुग्णांनाही निगेटिव्ह रुग्णांच्या यादीत समावेश करुन चालणार नाही. कारण, त्याने अनेक पॉझिटिव्ह रुग्ण टाळले जातील आणि त्याने संसर्ग प्रसार होण्याचा धोका वाढेल”.

आयसीएमआरने या पत्रा नमूद केलंय की सीटी मूल्यासाठी जागतिक स्तरावर स्वीकारलेल्या कट-ऑफचे 35 ते 40 पर्यंतचं आहे. पण तेदेखील स्वतंत्रपणे उत्पादकांनी ठरवलेली असते.

ADVERTISEMENT

आयसीएमआरमधील साथ आणि संसर्गजन्य आजार विभागाचे प्रमुख डॉ. समीरन पांडा म्हणतात “संसर्ग झालेला व्यक्तीची चाचणीही निगेटिव्ह येऊ शकते. ज्याने तो उफचार घेणार नाही आणि त्याच्या माध्यमातून समाजात संसर्ग पसरेल. जर ऑक्सिजन सॅच्युरेशन, लक्षणं यासारख्या बाबींवर डॉक्टरांनी लक्ष ठेवलं तर डॉक्टरांना व्यक्तीला संक्रमण झालंय का याचा नेमका अर्थ लावता येईल.”

ADVERTISEMENT

रुग्णांना कोव्हिड उपचार लिहून देताना डॉक्टरांनी सीटी मूल्य गांभीर्याने घ्यावे का यावरही डॉ. पांड भाष्य करतात . हे रोगाच्या तीव्रतेशी संबंधित आहे का या प्रश्नांवर डॉ. पांडा उत्तर देतात, मुळीच नाही. हे फक्त या रोगाच्या तीव्रतेशी संबंधित आहे. एखाद्या रुग्णाला जास्त प्रमाणात सीटी मूल्य असू शकते तरीदेखील त्याला जास्त संसर्ग झालेला असू शकतो. तर कमी सीटी व्हॅल्यू असलेल्या रुग्ण एसिम्प्टोमॅटिक असू शकतो. सर गंगा राम रुग्णालयाचे वरिष्ठ इंटेंसिव्हिस्ट डॉ. धीरन गुप्ता म्हणाले, “सीटीचे मूल्य कमी असले तरी रुग्णाला लक्षणे नसू शकतात. चाचणीसाठी नमुना गोळा करणे, कोणत्या दिवशी ते गोळा केले गेले, कुठे संग्रहित केले गेले, यावरही चाचणीचे रिपोर्ट आधारीत असतात”

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT