Tauktae चक्रीवादळ मुख्यमंत्री रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना भेट देणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Tauktae चक्रवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी भेट देणार आहे. तसेच प्रशासनाकडून आढावाही घेणार आहेत. सकाळी ८.३५ ला ते रत्नागिरी विमानतळावर उतरतील त्यानंतर 8.40 ला आढावा बैठक घेतील.

ADVERTISEMENT

त्यानंतर कसा असणार आहे मुख्यमंत्र्यांचा दौरा?

सकाळी 9.40 वाजता हेलिकॉप्टरने चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे आगमन व मोटारीने वायरी ता. मालवणकडे प्रयाण

हे वाचलं का?

सकाळी 10.10 वाजता वायरी, ता.मालवण येथे “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

सकाळी 10.25 वाजता मोटारीने मालवण येथे आगमन व “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

ADVERTISEMENT

सकाळी 11.05 वाजता निवती, ता. वेंगुर्ला येथे “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

ADVERTISEMENT

या पहाणीनंतर सकाळी 11.30 वाजता चिपी विमानतळ बैठक सभागृह येथे मोटारीने आगमन व नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक

चिपी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरीकडे प्रयाण

दुपारी 12.35 वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण

असं मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचं स्वरूप असणार आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही कोकणाचा दौरा केला आणि नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर सरकारने नुकसानग्रस्तांना तातडीने मदत जाहीर करावी अशीही मागणी केली आहे. तसंच ठाकरे सरकारने निसर्ग वादळात नुकसान झालेल्यांनाच भरपाई दिलेली नाही असंही म्हटलं आहे. फडणवीसांच्या या आरोपांना मुख्यमंत्री उत्तर देणार का? आणि मदत जाहीर केली तर ती नेमकी काय स्वरूपाची असणार आहे हे दोन मुद्दे महत्त्वाचे असणार आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT