Tauktae Cyclone चा गोव्याला फटका, दोघांचा मृत्यू…अनेक घरांचं नुकसान
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर किनारपट्टीच्या लगत असलेल्या राज्यांना तौकताई चक्रीवादळाचा फटका बसला आहे. केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांना चक्रीवादळाचा फटका बसणार आहे. गोव्यात आज सकाळी चक्रीवादळाने जोरदार धडक दिली. ज्यात दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. Two deaths have been reported in Goa. More than 500 trees have […]
ADVERTISEMENT
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर किनारपट्टीच्या लगत असलेल्या राज्यांना तौकताई चक्रीवादळाचा फटका बसला आहे. केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांना चक्रीवादळाचा फटका बसणार आहे. गोव्यात आज सकाळी चक्रीवादळाने जोरदार धडक दिली. ज्यात दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.
ADVERTISEMENT
Two deaths have been reported in Goa. More than 500 trees have fallen. Around 100 major houses and 100 minor houses were damaged. Roads are blocked. The power supply is disrupted: Goa Chief Minister Pramod Sawant #CycloneTauktae pic.twitter.com/VNZzA8aXuW
— ANI (@ANI) May 16, 2021
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ANI शी बोलताना माहिती दिली. संपूर्ण राज्यभरात ५०० पेक्षा जास्त झाडं पडली असून १०० मोठी आणि तितक्याच लहान घरांचं या वादळात नुकसान झालंय. अनेक ठिकाणी झाडं रस्त्यावर कोसळून रस्त्यांचं नुकसान झालं आहे. तसेच राज्यत विजेचा पुरवठाही खंडीत झाला आहे.
तौकताई चक्रीवादळ (Tauktae Cyclone) हे सध्या कोकण किनारपट्टीच्या दिशेने हळूहळू पुढे सरकू लागलं आहे. या वादळच्या येण्याने प्रचंड वेगाने वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी घराची पडझड किंवा झाडं कोसळण्याच्या घटना समोर येत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यात अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याचं समोर आलं आहे. यावेळी कोकण रेल्वेच्या (Konkan Railway) रेल्वे ट्रॅकवर जवळजवळ 3 ठिकाणी मोठमोठे वृक्ष उन्मळून पडल्याने नेत्रावती एक्सप्रेस माजोर्डाजवळ रखडली आहे.
हे वाचलं का?
यामुळे गोव्याच्या दिशेने जाणारी अप आणि डाऊन मार्गावरील थिवि ते मडगाव रेल्वे वाहतूक सेवा खोळंबली असल्याचं समजतं आहे. सध्या तीनही ठिकाणी ट्रॅकवर पडलेली झाडं हटविण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक अद्यापपर्यंत सुरुळीत होऊ शकलेली नाही.
आज (रविवार) सकाळी मडगाववरुन निघालेली नेत्रावती एक्सप्रेस ही ट्रॅकवर झाड कोसळल्याने मडगाव आणि थिवी यांच्यामध्ये रखडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक मात्र पूर्णपणे ठप्प झाली आहे.
ADVERTISEMENT
Tauktae Cyclone: तौकताई चक्रीवादळाचा प्रकोप, अंगावर काटा आणणारी ‘दृश्य’ कॅमेऱ्यात कैद
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT