Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळ नावाचा वाद काय? आंदोलन चिघळू नये म्हणून सरकारने कसली कंबर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण मुद्दा चिघळला असून आज (24 जून) सिडको भवनला घेराव घालून आंदोलन करण्याची हाक देण्यात आली आहे. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी स्थानिकांची आग्रही मागणी आहे. तर राज्य सरकारने आधीच या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं असल्याचं जाहीर केलं आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज सिडको भवनला घेराव घालून आंदोलन करण्यात येणार आहेत. दरम्यान या आंदोलनालात जवळजवळ एक लाखांहून अधिक स्थानिक नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती संघर्ष समितीने दिली आहे. यामुळे आता या संपूर्ण परिसरात प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यामुळे सिडको भवन परिसराला आता छावणीचं स्वरुप आलं आहे.

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचं नाव ठरलं, ठाकरे सरकारचा नेमका निर्णय काय?

हे वाचलं का?

आंदोलनामुळे वाहतुकीत बदल

दरम्यान, या आंदोलनाची दखल घेवून पोलिसांनी तब्बल 12 तास नवी मुंबई शहरातील अंतर्गत रस्ते वाहतूक बंद करून पर्यायी रस्त्याने वाहतूक वळवली आहे. याचा परिणाम मुंबई-बंगळुरू, गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि सायन-पनवेल महामार्गावरील वाहतुकीवर होणार आहे.

ADVERTISEMENT

भूमिपुत्रांनी आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण मुद्द्यावर सायन-पनवेल महामार्गालगत असलेल्या सिडको भवन या इमारतीला घेराव घालण्याचा इशारा दिल्यावर वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

ADVERTISEMENT

नवी मुंबईत येणाऱ्या-जाणाऱ्या जड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 पर्यंत वाहतूक बंद असणार आहे.

औद्योगिक वसाहतीसाठी महत्वाच्या असणाऱ्या ठाणे बेलापूर रस्त्यावरील हलक्या वाहानांची वाहतूक ही मुंब्रामार्गे वळविण्यात आली आहे. ज्यामुळे वाहतूकदारांना लांबचा वळसा घेऊन इच्छित स्थळ गाठावे लागत आहे.

कोपरखैरणे ते सीबीडी, खारघर ते सीबीडी, नेरुळ ते सीबीडी अंतर्गत मार्ग देखील पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. याशिवाय

मुंबईकडून येणारी वाहतूक महापे शिळफाटा मार्गे पुण्याकडे वळविण्यात आली आहे. तर पुण्यावरून येणारी गाड्यांना तळोजा, मुंब्रा, महापेमार्गे मुंबईत जावं लागणार आहे.

Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरुन भाजप-शिवसेना आमनेसामने… नेमकं प्रकरण काय?

नेमका वाद काय?

सुमारे 900 हेक्टर जमीन संपादित करून तब्बल सोळा हजार रुपये खर्चून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Navi Mumbai indternational Airport) प्रस्तावित निर्मिती सिडको (Cidco) व शासनामार्फत होत आहे.

या विमानतळाला शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव देण्यास स्थानिकांच विरोध आहे. या विमानतळाला स्वर्गीय दि. बा.पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्यात यावं अशी येथील स्थानिकांची मागणी आहे.

यासाठी 10 जून रोजी ठाणे-बेलापूर रस्त्यावर हजारो भूमिपुत्र व शहरातील नागरिकांनी मानवी साखळी अभिनव आंदोलन पुकारून तीव्र आंदोलन केलं होतं.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण केंद्रीय कृती समिती आणि नवी मुंबई शहरातील समितीने आंदोलनाची हाक दिल्यावर भूमिपुत्रांनी हजारोच्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला होता.

या आंदोलनाचे पडसाद शेजारच्या रायगड ग्रामीण व ठाणे ग्रामीण भागात देखील उमटल्याने स्थानिक भूमिपुत्र या चळवळीत सहभागी झाले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT