राज्य कोरोनातून सावरतंय, नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मार्च महिन्याच्या मध्यावधीपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रात आता परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांपेक्षा बरे होऊन डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या अधिक होते आहे. शुक्रवारीही हा ट्रेंट कायम राहिला. राज्यात आज ३९ हजार ९२३ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून ५३ हजार २४९ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.

ADVERTISEMENT

रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाउनची घोषणा केली, ज्यामुळे वाढती रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यात सरकारला यश आलंय. परंतू मृत्यूदर कमी होत नसल्यामुळे सरकारसमोरची चिंता कायम आहे. राज्यात आज ६९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेचं संकट अजुनही पूर्णपणे टळलेलं दिसत नाहीये.

दुसरीकडे मुंबईतल्या रुग्णसंख्येतही आजच्या दिवशी कमालीची सुधारणा होताना दिसत आहे. मुंबईत १६५७ नवे रुग्ण सापडले असून ६२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हे वाचलं का?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रात लसींच्या तुटवड्यामुळे राज्य सरकारला १८ ते ४४ वयोगटाचं लसीकरण थांबवावं लागलंय. मुंबईत अनेक केंद्रावर लसीचा पुरेसा साठा नसल्यामुळे लोकांना परत जावं लागतंय. अशा परिस्थितीत मुंबई महापालिकेने शनिवार-रविवारी लसीकरण बंद ठेवलं आहे.

लसीकरणाबद्दलची पुढची माहिती नागरिकांना लवकरच कळवण्यात येईल असं महापालिकेने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन जाहीर केलंय.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT